पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


थोड्या खर्चाची असावी. उत्सवप्रसंगीं गेल्या वर्षांत आपण काय शिकलो, काय शिकावयास पाहिजे, याच्या निरीक्षणाकडे लोकांचें लक्ष वेधावें, उत्सवांतील भोजन- पक्वान्ने यांना टाळा देता आल्यास उत्तमच. निदान आटोपशीरपणा आणावा. नाहींतर सर्व शक्ति त्यांतच खर्च होऊन जाते.
 उत्सवाप्रमाणें गांवांत किंवा गांवाच्या आसपास ज्या जत्रा भर- तात त्यांकडेहि सुशिक्षितांचें लक्ष पाहिजे. जत्रांमध्ये धान्य, श्रीं, खत आणि जनावरें यांचें प्रदर्शन उघडावें. उत्तेजनार्थ बक्षिसे द्यावीत. लोकांच्या दररोजच्या व्यवहाराला लागणाऱ्या गोष्टींची शास्त्रीय माहिती द्यावी. जत्रांमध्ये ज्या वाईट गोष्टी असतात त्या कां नाहींशा केल्या पाहिजेत, हे लोकांना सांगावें. जत्रांच्या व्यवस्थेकरितां गांवांतीलच स्वयंसेवक बोलवावे.
 खेड्यांत राहून करण्यासारखीं कामें पुष्कळच आहेत. त्या सगळ्यांचा विचार येथे करणें शक्य नाहीं. जात्यावर बसलें कीं जशी ओंवी आठवते तसेच काम करणाऱ्यालाही पुढील काम आपोआप सुच- तेंच. ह्मणून शेवटी कापसाचे पीक होते अशा खेड्यांत चरका व स्वादी या संबंधानें काय करावें एवढे थोडक्यांत सुचवून हें प्रकरण संपवितों.
 कळ खेडयांत कापूस पिकतो, तेथे अद्याप सूत कातणाऱ्या थोडाबहुत जुन्या बाया आढळतात. प्रत्येक खेड्यांत चरक्याचा प्रसार केला तर खेड्यांतील रिकाम्या लोकांना एक चांगला उद्योग होईल. खेडयांतील शेतकऱ्यांना शेताचे काम सरासरी आठ महिने असतें व बायकांना तर चारच महिने असतें. आळसांत व रिकाम- पणांत काळ घालविणें हें राष्ट्राच्या दृष्टीनें हानिकारक आहे. शेतांतलीं कामे संपल्यावर शेतकऱ्यांनीं व त्यांच्या बायकांनी दररोज तास दोन- तास उद्योग करून सूत कातण्यावर आणा दोन आणे मिळविले तरी ती त्यांची कमाईच आहे. शेतीचे काम नसतें अशावेळी सर्व दिवसभर शेतकऱ्यानी व त्यांच्या बायकांनी सूत कांसले तर बसल्या-