पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


जाण्याकरितां लोकांपुढे याचना करण्याचा प्रसंग येतो.'परदेशांत जाऊन आपण काय बहादुरी करणार ? अमेरिका किंवा इंग्लंड देशांत जाऊन तुह्मीं देशाच्या सांपत्तिक स्थितींत कांहीं भर टाकणार ? अथवा बॅरिस्टर आणि डॉक्टर होऊन आणखी दोन चार अक्षरें नावापुढे लावून आमच्याच लोकांना जास्त लुबाडण्याचा धंदा आरंभणार ?' असे प्रश्न कोणी केल्यास रोखठोक उत्तर देण्याची मारामारच पडते.परदेशांत जाणे, आणि तेथून अमुक एक गोष्ट इतक्या दिवसांत नक्की शिकून येणें व स्वदेशांत आल्यावर अमुक गोष्ट साध्य करण्याकरितां प्रयत्न करणें, हें पूर्वी ठरविलेले नसल्या- मुळे पुष्कळांना पैसे जमवितांना खूप त्रास पडतो. एकादे वहा- पैसे जमवून परदेशी गेले, तर तेथे " विनायकं प्रकुर्वाणो रच- यामास वानरम् " अशी त्यांची गत होते. एका उद्देशानें परदेशीं जावें, तेथे गेल्यावर कांहीं निराळेंच शिकावें व करावे, स्वदेशी आल्या वर येथील कामाचा व तेथील शिक्षणाचा कांहीं संबंध नाहीं, अशा स्थितींत पुष्कळांची आयुष्ये व द्रव्य हीं व्यर्थ जात आहेत. पैसे न मिळाले ह्मणजे मग स्वावलंबनाचे विचार डोक्यांत घोळू लागतात.. स्वावलंबन हा शब्द उच्चारल्याबरोबर कांहीं अंगी स्वावलंबन येत नाहीं. त्याची पूर्व तयारीच असावी लागते. तशी तयारी नाहीं, निश्चित ध्येय नाहीं, आणि जवळ पैसा नाहीं अशा स्थितीत पुष्कळ दिवस व्यर्थ गेले ह्मणजे मग अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली, तुर्कस्थान, अफगाणिस्थान या देशांवरून उड्या मारीत, कल्पना तरंग, हिंदुस्थानांतील आपल्या गांवच्या किंवा आसपासच्या इंग्रजी शाळेच्या मास्तरकी पर्यंत येऊन थडकतात ! शेवटीं कांहीं तरी करून उदरंभरण करणें येवढेच देशकार्य शिल्लक रहातें ! आह्मी आमच्या संस्थेच्या प्रचाराचें कार्य करित असतांना दुसरा एक चमत्कार पाहिला. तो चमत्कार ह्मणजे हा कीं, प्रत्येक कोर्ट असलेल्या गांवीं हल्लीं वकीलांची अगदी रेलचेल होऊन एल्. एल्. वीच्या पदवीची किंमत जो तो आपल्या