पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


तुटक न रहाता एकमेकांच्या सहकाराने वागण्याची वृत्ति लोकांत उत्पन्न होईल.
 ग्रामसभेनें प्रत्येक गांवांत एकेक ग्रामपंचायत स्थापन केली पाहिजे. ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा विधायक कार्यक्रम आज राष्ट्रा पुढे मांडला जात आहे. तो अमलांत आणण्यासारखा आहे. ग्राम- संस्था आपल्या भरतखंडामध्ये फार प्राचीन काळापासून आहेत. इंग्रजी राज्य आल्याबरोबर त्या एकदां चुरडल्या. आज पुनः सर- कारच्या मदतीनेच त्यांचे पुनरुज्जीवन होत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. गांवांतल्या तंत्र्यांचा निकाल ग्रामपंचायतीने केला तर पैसा, श्रम, हीं वांचून लोकांचा फायदा होईल. गांवांतला तंटा बाहेरगांवीं नेऊन वकिलामार्फत कोर्टात तंटा लढविण्याची लोकांना लागलेली संवय बंद झाली पाहिजे. गांवावांचून गत्यंतर नाहीं, गांवांतल्या गांवांत राहून भांडणतंटे करणें बरें नव्हें हें ग्रामपंचाइतीच्या निकाला- मुळेंच लोकांना कळू लागेल.
 ग्रामसभेने शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याकरितां प्रत्येक खेडयांत पतपेढीची स्थापना केली पाहिजे. शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्याच्या काम पतपेढ्यांचा चांगला उपयोग होतो. थोड्या व्याजाने कर्ज मिळाले व तें वेळेवर वसूल केलें गेलें तर शेतकऱ्याची चांगली सोय होते. व्यसने, उधळपट्टी, व अडाणीपणा यांमुळे खालावलेल्या शेतकरीवर्गाला सावकारापेक्षां निराळ्या वृत्तीनें पैसे देणाऱ्या संस्थेची आवश्यकता आहे. ज्या खेड्यांत पतपेढ्यांच्या कामांत चांगली माणसें पडलेली आहेत, त्या उत्तम चाललेल्या आहेत. कांहीं पेढ्या सपशेल बुडाल्या आहेत. त्याचें कारण कर्तव्यदक्ष व उत्साही माणसे यांत नाहींत हेंच होय. आपल्या देशांत चारचौघांनी मिळून एकादे काम करण्याची संवय नाहीं. ती संवय या पतपेढ्यांपासून खेडे. गांवांतील लोकांना लागली तर तो कांहीं लहानसहान फायदा नाहीं.
 तालीमखानाः प्रत्त्येक खेड्यांत बलाच्या उपासनेकरितां एकएक तालीमखाना पाहिजे, पांचपन्नास मंडळी व्यायामाकरितां