पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावे. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१५१


रयतेचे हक्क कोण आहेत, हे अधिकारी रखतेचे मालक साहित की नोकर आहेत याबद्दलचे शिक्षण शेतकऱ्यांना दिले पाहिजे. शेतकन्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अधिकारीवर्ग पाहिजे तसा हुतुतू घालतो. वेठबिगारीच्या कामामध्ये तर ' देवो दुर्बलघातकः ' असा अनुभव येतो. रेल्वेमध्ये तिसन्यावर्गाच्या उतारूंना कसें आद- रातिथ्य मिळतें हैं महशूर आहेच. हाणून रेल्वे, पोस्ट, कचेन्या, कोट, आणि गांवकी यांच्या नियमांचे शिक्षण ग्रामसभेने लोकांना दिले पाहिजे. अन्यायाविरुद्ध पद्धतशीर, चिकाटीने व दीर्घकाल चळवळ करण्याची प्रवृत्ति लोकांना लावली पाहिजे. अर्ज करणें, निषेध करणे, अधिकाऱ्यांना भेटणें अशातऱ्हेच्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्यास करून अन्यायाची दाद लावून घेणे, रयतेला अधिकान्यांच्या व सावकारांच्या कचाटींतून सोडविणे हे ग्रामसभेचे मुख्य काम असले पाहिजे.
 ग्रामसभेने लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्य हा विषय मोठा व्यापक असला तरी सामान्य ज्ञानाच्या अभावी जनता जी मृत्युमुखी पडत आहे तिला प्रतिबंध केला पाहिजे. शेत- कन्यांची घरे, त्यांची रहाणी, त्यांची जनावरें, पोरें, गोठें, या बाब तीत ग्राम सुधारणा सुचविल्या पाहिजेत. दररोज स्नान कां करावें कपडे स्वच्छ कां करावेत, वरांत उजेड कां पाहिजे, गोठ्यांत विज- त्याने आरोग्य करें विधडतें, घरांत जनावरें कां बांधू नयेत इत्यादि विषय सांगोपांग ज्ञान संभाषणद्वारा शेतकन्यांना दिले पाहिजे.
 ग्रामसभेने लोकांना समाजसेवेचे शिक्षण दिले पाहिजे. जनता- त्म्याची सेवा करण्याकडे लोकांची प्रवृत्ति वळविली पाहिजे. गांवांत रोगाची सांध आली की रोग्याला मदत करण्याकरितां लोक धांवून गेले पाहिजेत. गांवांत कोठे आग लागली, कोणी मृत्युमुखी पडलें, कोणावर काही मोठी आपत्ति आली, तर या प्रसंगी सेवा करण्याचा स्वभाव लोकांचा बनला पाहिजे. पूर्वीची लोकोपकारी वृत्ति अथवा हलीची सामाजिक भावनेची वृति लोकांम थाली तरच तुटक