पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


शिस्तीत एका ठिकाणी, एका देखरेखीखाली राहिले तर त्यांची शारीरिक, मानसिक, बौदिक उन्नति होईल. काणा, निरलसणा टापटीप, इत्यादि सद्गुगाई वाढतील, आस्तिक्य, श्रद्धा, भावना, यांचा जो लोग आत्र आढळतो, तो या मुलांच्या ठिकाणी आढ ळणार नाहीं. वसतिगृह व्यवस्थापकांनी शाळामास्तरांशी सहकार्य संपादावें, आपले विचार त्यांना पटवून द्यावे झगजे परस्पर गैरसमज रहागार नाहींत. वा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना आपल्याबरोवर सुटीत प्रवासाला यावें, केव्हां केव्हां शेतांत काम करण्यास न्यावें, उत्सवजनांचे प्रसंग दाखवावे, फार काय पण सुबुद्ध बाप जशी मुलांची काळजी घेतो तशी त्याने विद्याथ्यांची सर्व तन्वी काळजी घ्यावी.
 ग्रामसभा:- प्रत्येक खेड्यांत ग्रामसभा स्थापन केली पाहिजे. ग्रामसभवांचून गांवांत नियंत्रणशक्ति उत्पन्न होणार नाहीं, ग्राम- संत प्रत्येक जातीचे प्रतिनिधि असावेत. तेवांपेक्षा जास्त नसा- वेत. गांवच्या हितसंबंधाच्या सर्व तन्हेच्या गोष्टींचा विचार ग्रामस भेने करावा. ग्रामसभेला एकदम महत्त्व येणार नाहीं. तिनं केलेले नियम पाळले जाणार नाहींत. प्रसंगी तिचा उपहास होईल. तथापि कांहीं दिवसांनी तिला महत्त्व आल्यावांचून राहणार नाहीं. कांहीं खेड्यांमध्ये असे होते की गांवांतला एकादा पुंड मनुष्य पैशाच्या व सरकारी वशिल्याच्या जोरावर सर्व गांव होरपळून टाकतो. अशा माणसाच्या अत्याचाराला ग्रामरामेमार्फत आळा घालतां येईल. ग्रामसभा, बालुकासभा, जिल्हासभा, अशीच मालिका यापुढे लागली पाहिजे. ग्रामसभेनें गांवच्या गाण्यांची दाद कौन्सिलरामार्फत लावून घेतली पाहिजे.
 ग्रामसभेनें लोकांना स्वतःच्या हक्कांचे शिक्षण दिले पाहिजे. यःकश्चित् सातआठ रुपये पगाराचा चपराशी व शिपाई शेतकन्याला डाफरतो ही स्थिति कार वाईट आहे. पोलीस, बाटी, बुलकर्णी, भागकारकून, मामलेदार, फौजदार यांचे अधिकार काय आहेत,