पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१४९


लयें हीं प्रत्येक ठिकाणी पाहिजेत. वर्तमानपत्रे, मासिके यांचें वाचन शेतकऱ्यांकरितां गांवांत चारदोन ठिकाणीं तरी होत असावें. भजनी अड्डे गांवामध्ये असतात. चारमंडळी एकत्र जमून हरिविजय पांडवप्रताप वाचीत असतात. त्यांतच वर्तमानपत्रे व मासिके यांचा शिरकाव करावा. भजनी अड्डयांचे महत्त्व अधिक वाढवावे. लोक- समुदाय जमण्याला भजन हे चांगले साधन आहे. स्वतः भजन करून मधूनमधून लोकांना इतर माहिती सांगावी. लिहिण्याची व वाचनाची गोडी एकदम लागणार नाहीं, तरी कथा पुराणांप्रमाणे- वर्तमानपत्रे हि ऐकण्याची संवय लोकांना लाविली पाहिजे. दर आठ दिवसांतून एक दिवस या कामाकरितां दिला तरी पुष्कळ कार्य होईल.
 बिनजेवणाची विद्यार्थीगृहैः- शिक्षणसंस्थांची जशी आज जरूर आहे तशीच विद्यार्थ्यावर चांगली देखरेख ठेवून त्यांना शिस्त व इतर वळण लावणाऱ्या संस्थांचीहि फार जरूर आहे. शिक्षणासाठीं मुलांना आपली गांवें सोडून तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणीं यावे लागते, तेथे योग्य देखरेख नसली कीं मुले बिघडतात. प्रत्येक तालुक्यांत आणि चारपांच हजार वस्तीच्या खेड्यांतसुद्धां पंचवसितीस विद्यार्थ्यांचे एकेक वसतिगृह चालूं शकेल, या वसतिगृहांत जेवण्या- खाण्याचा खटाटोप बिलकुल नसावा. विद्यार्थ्यांनीं घरीं अगर खाणावळींत जेवावें, शाळेत शिकावें. बाकी सर्व वेळ विद्यार्थ्यांनी या वसतिगृहांत रहावें. त्यांना शाळांत जें शिक्षण मिळत नसेल तें शिक्षण द्यावें. पहाटे उठणे, व्यायाम करणें, धार्मिक आचार व विधि पाळणे या गोष्टी त्यांना शिकवाव्या. या वसतिगृहांत तसि चाळीस निवडक विद्यार्थी घ्यावेत. प्रत्येक मुलामागें देखरेखीबद्दल एक रुपया मोबदला पालकाकडून मिळेल. वसतिगृहाचा व्यवस्थापक पोक्त, दक्ष, प्रेमळ असा असावा. पदवीधर असल्यास उत्तम. ह्मणजे त्याला विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासांतहि मदत करितां येईल. शाळा व भोजन याव्यतिरिक्त बाकीचा सर्व वेळ जर विद्यार्थी एका