पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


आहे. पांडुरंग हें दैवत जसें साम्य व प्रेम उत्पन्न करणारे आहे, तसे बलभीम हें दैवत बल उत्पन्न करणारें आहे. ह्या बलाच्या देवतेचा पुरस्कार धर्मोपदेशकांनी करणें अवश्य आहे. ह्या देव- तेच्या निशाणाखालीं सर्व हिंद्रलोक एक होतील असा प्रयत्न करणे इष्ट आहे. तीनशे वर्षापूर्वी निर्बल समाजा- मध्यें बल उत्पन्न करण्याकरितां समर्थांनी याच देवतेची उपासना महाराष्ट्राला दिली. प्रत्येक खेड्यांत या देवतेचे देवालय पाहिजे. हल्लीं समाजांत बलाची किती आवश्यकता आहे हें सांगावयास नकोच. बलभीम या बलदात्री देवतेच्या अधिष्ठानाखालीं सर्व हिंदीलोक बल- संपन्न होऊन राष्ट्राचे स्वयंसेवक बनले पाहिजेत. स्वयंसेवकांचा उच्च आदर्श ह्मणून, बलाची देवता हाणून, प्रत्येक तालमींत, प्रत्येक गांवांत, प्रत्येक खेड्यांत बलाची उपासना सुरू झाली पाहिजे.
 शिक्षणः - सुशिक्षित तरुणांनीं हातीं घेण्यासारखें शिक्षणाचें एक पवित्र कार्य आहे. आपल्या देशांत अद्याप शिक्षणाचा प्रसार पुष्कळ झाला पाहिजे, बहुजनसमाजाच्या अज्ञानामुळें पुष्कळ अनर्थ होत आहेत. लोकांना आपले हक्क आहेत याची जाणीव उत्पन्न होण्याला साक्षरता ही अवश्य पाहिजे. इतर देशांशीं आमच्या देशाची तुलना केली तर असें आढळून येईल की, इतर देशांतील साक्षरांची संख्या आमच्या देशांतील निरक्षरांच्या संख्येइतकी आहे. हें गाढ अज्ञान नाहींसें होण्याला शिक्षण सक्तीचे व मोफत सुरू झाले पाहिजे. ही गोष्ट सरकारचे हातची आहे; तरी कांहीं प्रयत्न अवश्य झाले पाहिजेत. खेड्यापा- ड्यामध्ये रात्रींच्या शाळा काढून पुष्कळ शेतकऱ्यांस साक्षर करितां येईल * गांवांतील प्रतिष्टित वजनदार मंडळीच्या मदतीनें हें काम करण्यासारखें आहे. रात्रींच्या शाळा व त्यांना जोडून मोफत वाचना-


 * रात्रींच्या शाळांचे महत्त्व ' Moonlight Schools' या अमेरिकन पुस्तकांत चांगले सांगितलें आहे. तरुणांनी तें अवश्य वाचावें.