पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावे. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१४७


कसे होणार? कारण. पुराणिक, हरिदास लोक त्यांच्या समाजामध्यें जाऊन त्यांना उपदेश करीत नाहींत, या धर्मज्ञानाच्या व धर्मश्र- देच्या अभावामुळे पुष्कळ हिंदुलोक अहिंदु बनतात, ह्या अन- र्थांचा प्रतिकार करण्याकरितां पुष्कळ उपदेशक केवळ अस्पृश्य वर्गाला उपदेश करणारे निवाले पाहिजेत.
 हह्रीं प्रवृत्तिप्रान उपदेशाची जरूर आहे. धर्म, जात, वर्ग, पंथ यांवर भर न देतां केवळ मानवधर्माचं विरूपण आज समाजापुढे झाले पाहिजे. समाज शीलसंपन्न, कर्तृत्ववान्, दत्रिद्योगी, कर्तव्य- दक्ष व प्रवृत्तियुक्त होण्याला अशा जिवंत उपदेशकांची फार जरूर आहे. समर्थांचे वेळी असे उपदेशक ह्मणजे एकेक जिवंत वर्तमान पत्रच होतें. ह्या वर्गाकडून जी भरीव कामगिरी होते तीं वर्तमानपत्रां- कडून होत नाहीं. आरोग्य, साथी रहाणी, एकी, मद्यपानपराङ्- मुखता, ग्रामव्यवस्था, ग्रामसंस्था इत्यादि विषयांची हि बहुजनसमा जाला चांगली ओळख झाली पाहिजे. सर्व हिंदु व हिंदीलोक एका छत्राखाली येतील असा उपदेश उपदेशकांनी केला पाहिजे. परमत- सहिष्णुता हाहि गुण समाजाला शिकविला पाहिजे. ज्ञानेश्वरासारख्या सत्पुरुषांनी मराठी भाषेमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ठेवला आहे. या सुकाळाचे जिवंत द्योतक ह्मणजे वारकरी पंथ होय. हा वारकरी पंथ समाजामध्ये साम्य उत्पन्न करणारा पंथ आहे. ह्या पंथाच्या योगानें हजारों हिंदु हिंदुत्वाला चिकटून राहिले आहेत. ह्या पंथाचे अनुयायी होऊन सुशिक्षितांना पुष्कळ सुधारणा करितां येण्यासारखी आहे. सर्वावर सारखे प्रेम करणारा, सर्वांना मुक्ति देणारा ब्राह्मणापासून धेडापर्यंत सर्वांना गोंजारणारा असा वारकऱ्यांचा एक पांडुरंग देव आहे. ह्या पांडुरंगाच्या भक्तीने ब्राह्मणापासून वेडात सर्व सुक्तीला गेले आहेत. पांडुरंगाने मोक्षाचा दरवाजा सर्वाकारितां खुला ठेविला आहे. जात, गोत, पंथ ह्यांचा विचार नाहीं असा हा संप्रदाय आहे. सर्व हिंदूंचा देव जो पांडुरंग त्याचे प्रत्येक खेड्यांत देवालय पाहिजे. सर्व महाराष्ट्राला हे दैवत प्रिय