पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


पाहिजेत. त्या शिवाय कीर्तन व भजन त्याला करितां आले, हाणजे तर त्याचे कार्यसामर्थ्य अधिकच वाढेल. गोरगरीबांवर केलेले उपकार कधीही व्यर्थ जात नाहीत अशा भावनेने वैद्याने काम केलें तर त्याला कांही कमी पडणार नाहीं. हाणून सुशिक्षितांनी वैय होऊन खेड्यांत जाऊन रहावे.
 धर्मोपदेशक- खेड्यापाड्यांमध्ये राहून वैत्रकीच्या धंद्याबरोबर करण्यासारखा दुसरा व्यवसाय धर्मापदेशकाचा आहे. हल्ली धर्मा- पदेशकांची किंमत फार कमी होत चालली आहे. धर्मोपदेशकाला स्वतःच्या पोटापुरता कोणता तरी धंदा करितां आला हाणजे त्याच्या उपदेशाचे वजन लोकांवर अधिक पडेल, याचना ही सर्व गुणांची माती करणारी राक्षसी आहे. या याचनेच्या यात- नेमुळे सर्व उपदेशक जिकीरीला येतात. तेव्हां धर्मोपदेशक हा वर्ग तेजस्वी होण्यात सुशिक्षितांनीं व सुखवस्तु लोकांनी धर्मोपदेशकांचा पेशा पत्करणे योग्य व इष्ठ आहे. आमच्या समाजांत धर्माच्या विचित्र कल्पना व नीतीचे अव्यवहार्य सिद्धांत यांचे प्राबल्य वाढ- ल्यामुळे नानापंथ, नानामते यांचा सुकाळ झाला आहे. कोव्या कल्पनेमुळे धर्माच्या नांवाखालीं कलह, दुही व फूट हीं वाहून समाज रसातळास जात आहे. धर्मापदेशकाचा धंदा हा फार पवित्र धंदा आहे. नव्या कालानुरूप नवीन उपदेशाची जरूर आहे. जुन्या लोकांच्या कल्पना, त्यांची उपदेश करण्याची पद्धति, व उपदेश कर- ण्याची स्थाने हीं सर्व बदलली पाहिजेत. तरच परधर्मीयांच्या स्पर्धेत टिकतां येईल.
 अस्पृश्य लोकांचा प्रेमसंबंध वाढण्यास सुशिक्षित वैद्यांनीं धर्मो- पदेशक बनून धर्मशिक्षणाचे काम करण्यास आरंभ केला पाहिजे. जुन्या धर्मानिदेशकांचीं उन्देशस्थळें हागजे देवालये होत. देवालया बाहेर व फार तर स्वतःच्या घराबाहेर धर्माबद्दल एक अवाक्षरह बोलावयाचे नाहीं अशी त्यांची प्रतिक्षा ! या कलानेचे नवीन कालाया करो जुळणार? यामुळे अस्पृश्य लोकांना धर्माचे ज्ञान तरी