पान:विद्यार्थि धर्म.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावे. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१४५


 वैद्यक-तीनचार हजार वस्तीच्या खेड्यांत वैद्य या नात्याने चांगला योगक्षेम चालवून पुष्कळ कार्य करितां येण्यासारखें आहे. आर्यवैद्यक सर्व दृष्टींनी चांगलें असतां केवळ हलगर्जीपणाने तें मागें पडलें आहे. निसर्गशास्त्राचा असा नियम आहे कीं मनुष्य ज्या देशांत जन्माला येतो व ज्या हवापाण्यांत वाढतो त्याच देशांत व त्याच हवेंत त्या मनुष्याचे रोग बरें करणाऱ्या वनस्पति असतात. हल्ली पहावे तो सगळाच उलटा प्रकार ! सात महिन्यांच्या तान्ह्या मुलाला सातांसमुद्रांपलीकडील औषधें देण्यांत येतात. या औषधाचे सात्म्य कोट्याशीं कसें होईल याचा बिलकुल विचार होत नाहीं. विदेशी औषधें खाण्याची चाल फार प्रबल झाल्यामुळे वैद्यकपरंपरा ठार बुडत आहे. पूर्वीचे लोक असें सांगतात की, बारीकसारीक दुखणीं घरांतील बायका घरगुती औष- धानें बरी करीत असत, केव्हांतरी रोग अगदी असाध्य असला व रोगी आसन्नमरण असला ह्मणजे वैद्याची जरूर लागे. हल्ली जरा कानांत खुट्ट झालें कीं डॉक्टरला तार केली जाते. हा किती पराव- लंबीपणा व ही किती परप्रत्ययनेय बुद्धि ! आजीबाईचा बटवा, सांगशी यांत सुद्धां पूर्वी वैद्यक होतें. तशा लाताच्या बायका हल्लीं पहावयालाही मिळत नाहींत !
 शहरामध्ये डॉक्टरांचे दवाखाने पुष्कळ असतात. परंतु खेड्यांत आयुर्वेदिक औषधांचीच फार अपेक्षा आहे. कारण या देशी औषधांना खर्च थोडा पुरतो. शिवाय हीं औषधे व्यवहारांतील सुंठ, हिरडा, बेहेडा, नागरमोथा, आलें, लिंबू अशा पदार्थांची असल्यामुळे लोकांना त्यांची किंमत व उपयुक्तता कळू लागते. अमक्या औषधानें अमके रोग बरे होतात, सामान्य वैद्यक- ज्ञानहि वाढतें, व स्वदेशी औषधांचा प्रसार लवकर होतो. सारांश, चारदोन खेड्यांत तरी एखादा चांगला वैद्य पाहिजे, त्याला आपला उद्योग संभाळून पुष्कळ सार्वजनिक कार्य करितां येईल. वैद्याच्या ठिकाणी मधुर भाषण, मनमिळाऊपणा, चिकाटी हे मिशनरी गुण
 १९