पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें.]
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.


आंखीव, रेखीव, कार्यक्रम अथवा स्पष्ट ध्येय आणि त्याकरितां अह- र्निश चिकाटी व दयोद्योग या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. सर्व सामान्य समाजांतील चांगल्या लोकांची ही स्थिति ! तर मग विद्यार्थिवगत भावी आयुष्याच्या उज्ज्वल ध्येयाची कितीशी कल्पना असेल हें सांगावयास नकोच.

 हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा दोष निरपवाद आढळतो, तो हा कीं, ते आपल्या आयुष्याच्या ध्येयाचा विलकुल विचार करीत नाहींत. " मी जन्माला कोठें आलों, माझ्या आयुष्यांत मला काय करितां येईल, मजवर काय जवाबदारी आहे ? " याचा विचार कोणी करीत नाहींत. मराठी शाळा झाली की, इंग्रजी शाळेत जाणें, ती संपली की कॉलेजांत जाणें, तें आटपलें कीं जी नोकरी डोळ्यापुढे दिसेल तिच्यावर पतंगाप्रमाणें एकदम झांप टाकणे, अशी या विद्यार्थ्यांची शोचनीय स्थिति आहे. पुष्कळ विद्यार्थ्यांची गंमत अशी होते की, त्यांना वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत आपण कोण आहोत, आपली कुवत काय आहे, आप- ल्याला साधनांची अनुकूलता किती आहे, आपल्यांत कर्तृत्व किती आहे याचा अंदाज ह्मणून नसतो, गद्धेपंचविशीच्या भरात व सर्वज्ञपणाच्या घमेंडींत हे असले आत्मप्रत्ययशून्य विद्यार्थी भल- तीच महत्वाकांक्षा धरितात; आणि ती साध्य झाली नाहीं ह्मणजे समाजास दोष देत देत अगदीं कुत्सित व क्षुद्र बुद्धीच्या मंदिरांत जाऊन दडून बसतात. विद्यार्थी बी. ए. झाला कीं, त्यांच्या महत्वाकांक्षेच्या लाटा अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशाला जाऊन आदळतात, परदेशांत जाऊन काय करावयाचें, काय शिकावयाचें हें जरी ठरलेले नसले तरी चालतें. परंतु परदे- शांत जाण्यांतच त्यांना मोठा पुरुषार्थ वाटतो. कल्पना सृष्टीत कांहीं वेळ मौज असते. पुढे व्यवहाराच्या क्षेत्रांत उतरल्यावर ह्मणजे परदेशाला जाण्याची तयारी करण्याची वेळ आली की सर्वच गडबडतें. श्रीमंत विद्यार्थी सोडून दिला तर मध्यम स्थितींतील विद्यार्थ्यांस परदेशांत