पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावे. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१४३


खेड्यांत कांहीं नाहीं तरी लाखाची घडामोड होते. वजन, माप, हिशेब हीं ज्यांना माहीत नाहीत, असली माणसें खेड्यापाड्यांतील व्यापार करितात व चांगला पैसा मिळवितात. गांवांतील हीच astमोड व्यवहारज्ञ सुशिक्षितांमार्फत जर होऊं लागेल, तर सुशि- क्षितांचा योगक्षेम चालून व्यापारालाहि शुद्ध स्वरूप येईल. खेड्यां- तील व्यापार हाणजे हंगामाच्यावेळी स्वस्त दराने माल घ्यावा व तो पुढे महाग विकावा इतकाच असतो. या व्यापारांत तोटा होण्याचा फार थोडा संभव असतो. भांडवलहि फारसें लागत नाहीं. सुशिक्षितांनी 'अल्पारंभः क्षेमकरः ' या न्यायानें अल्प भांडवलावर प्रथम व्यापार करण्यास सुरवात करावी. मोठ्या भांडवलावर पुष्कळ नफा मिळतो, हें जरी खरे असलें तथापि भांडवल न गमावण्या- इतकी अक्कल येण्यास थोड्या भांडवलावर व्यापार सुरू करणें हेंच चांगलें. सुशिक्षितांनी व्यापारांत पडण्यापूर्वी थोडीशी त्या व्यवसायाची माहिती घेतली पाहिजे.
 दुर्दैवाची गोष्ट ही कीं पोष्ट, रेलवे, कस्टम, रेव्हिन्यु, या खात्यांत पदरचें खाऊन वर्ष दोन दोन वर्षे उमेदवारी करण्यांत आमच्या सुशिक्षितांना मोठें भूषण वाटतें. पण कापड, सराफी धान्यधून्य, भुसारीमाल यांच्या व्यवहारांत पडावयाचे असल्यास उमेदवारी करण्याची लाज वाटते. यास काय ह्मणावें ? सुशिक्षितांनी लाज सोडून, स्वतःचा सुशिक्षितपणा थोडासा बाजूला ठेवून एकाद्या व्यापाऱ्याचे शिष्यत्व पत्करावें. त्यांत त्याचा फायदा आहे. व्यापार हा केवळ भांडवलावर होत नाहीं. भांडवलावरोवर अनुभव, चिकाटी, परिश्रम, यांची जरूर असते. चांगल्या व्यापाऱ्याच्या सह- वासांत कांहीं दिवस घालविले तर व्यापारी सद्गुण व व्यापारी नेकी यांची माहिती होते. चार माणसांना कसे वागवावे, त्यांच्याशी कसा व्यवहार ठेवावा, हें चांगलें कळते. व्यापारांत सुशिक्षित मंडळी जास्त जास्त पडूं लागली झणजे सहकारितेच्या तत्त्वावर व्यापारी कंपन्या निघतील. व्यापारीं मासिके, व्यापारी वृत्तपत्रे निघून व्यापार-