पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


करून दाखविली की शेतकऱ्यांचे डोळे अशा माणसांकडे लागतील, शेतक-यांच्या मुलांना कारकून किंवा मास्तर व्हावें असें वाटतें; तें या - प्रत्यक्ष उदाहरणामुळें वाटणार नाहीं. आउतें, खतें, चीं, बियाणे, पेरणी, वेणणी, लावणी, कापणी, या सर्व बाबतीत शेतकरी लोक सुशिक्षित शेतकऱ्याचें अनुकरण करूं लागतील. सुशिक्षित शेतकन्याच्या गरजा थोड्या, आरोग्य चांगलें, रहाणी साधी अशा गोष्टी दिसूं लागल्या की इतर सुशिक्षितांचें लक्षहि स्पर्धेने या माणसांकडे लागेल. सुशिक्षितांचे लक्ष्य नोकरीवरून काढून उद्योगधंद्याकडे लावण्याचें जें महत्कार्य आज प्रयासाने करावें लागत आहे, तें आपोआप होईल. भाज्या कशा कराव्या, कशा व कोठें विकाव्या, कोणती फळझाडें कोठें लावावीत, गांवच्या आसपास असलेल्या निसर्गसिद्ध साधनांचा उपयोग कसकसा व कोठें कोठें करावा, याचें ज्ञान हळूहळू शेतकऱ्यांना मिळेल. शिक्षण नोकरीचे, विचार नोकर चे, अन्न नोकरीचें, आणि प्रजाही नोकरांची असे आज जिकडे- तिकडे दिसत आहे तें सर्वस्वी वाईट आहे. नोकरीत तरी मनुष्याला आठदहा तास खपावें लागतेंच. त्याशिवाय पुरेसा पैसा मिळत नाहीं. नोकरीप्रमाणे शेतीत निरलसपणें काम केलें, तर फायदा झाल्यावांचून रहाणार नाहीं. सारांश स्वपरहिताचा, जनतेला सुधारण्याचा, देशहिताचा, राष्ट्राचे अन्न तयार करण्याचा मोठा धंदा शेती हा आहे, तो धंदा करण्यास सुशिक्षित तरुणांनी यापुढे दिरंगाई करूं नये.
 व्यापार - सुशिक्षित तरुणांना खेड्यांत राहून करितां येण्या- सारखा दुसरा धंदा व्यापार हा आहे. आजचे सर्व जग व्यापारी बनले आहे. ज्याचा व्यापार मोठा तें राष्ट्र मोठें. ज्या राष्ट्राचा व्यापार जगावर चालतो, त्याचेंच साम्राज्य चालते; अशी ह्मण लवकरच पडणार आहे. सुशिक्षितांनी व्यापारांत लक्ष घातल्यावांचून व्यापाराला व्यापक व शास्त्रीय स्वरूप येणार नाहीं. हिंदुस्थानांतील खेड्यापाड्यांत कांहीतरी व्यापार हा चालतोच. दोन हजार वस्तीच्या