पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोळावें. ]
तरुण पिढी व खेडीपाडी.

१४१


 जिकडे तिकडे उद्योगधंद्यांचे शिक्षण पाहिजे, अशी हल्लीं ओरड चालू आहे. पण शेती हा जो देशांत मोठा उद्योग तिकडे कोणीच पहात नाहीं. चारदोन कृषिशास्त्रज्ञांनी सहकारितेनें भांडवल उभारून . तैलयंत्राच्या साह्यावर शेती करण्याचे उद्योग सुरू केले पाहिजेत. स्वतःची जमीन, यंत्राची चांगली माहिती व हलक्या व्याजाचे भांडवल, अशी सामुग्री असल्यास खात्रीनें यश येईल; व खेड्यांत राहून शहरांतल्या प्रमाणे मिळकत करितां येईल. हिंदुस्थानांतले पुष्कळ शेतकरी आज दहापांच माणसांचा व जनावरांचा योगक्षेम शेतीवरच चालवीत आहेत. शेतकरी निर्व्यसनी व व्यवस्थित असला तर तो चांगला श्रीमंत होतो, अशीही उदाहरणें आहेत. घरची बागाईत शेती, विहिरीला चांगले पाणी अगर पाटाचे पाणी, अगी व्यवस्था असल्यावर शेतकन्याला कंगाल रहाण्याचें मुळींच कारण नाहीं. व्यसनें, खटले, दारूबाजी यांमुळे शेतकरीवर्ग भुके- बंगाल झालेला आहे. पण सुशिक्षितांनीं हातांत नांगर धरण्याचा निश्चय केला व शेतांत खपावयाचें असें ठरविलें तर आज जो पोटाचा प्रश्न मोठा अवघड असा वाठत आहे, तो तेव्हांच सवघड होईल. कांहीं थोडा भाग सोडला तर हिंदुस्थानाची भूमी खरोखरीच कामधेनु आहे. या कामधेनूची जो एकनिष्ठपणे सेवा करील त्याला भरपूर खावयाला मिळेल.
 गेल्या शंभर वर्षांच्या शिक्षणाने सुशिक्षितांत पोषाखीपणा फार आला आहे; त्यामुळे पहिल्याने शेतांत खपणे त्रासदायक वाटेल. पण थोड्या दमानें व चिकाटीने एकदोन वर्षे काढली कीं सर्व अटकळ येईल. इज्जतीनें व प्रतिष्ठितपणे शेतीवर रहातां येऊ लागलें कीं शेतकऱ्यांचा अशा माणसांवर विश्वास बसेल. हिंदुस्थानांतील सुशिक्षितांचा जसा इंग्रजांवर विश्वास नाहीं, तसा अशिक्षितांचा सुशिक्षितांवर नाहीं. प्रत्यक्ष कृतीशिवाय यापुढे विश्वास बसणें शक्य नाहीं. सुशिक्षितांनी स्वतःची शेती स्वतः करून, किंवा नोकराचाकरां- पर देखरेख ठेवून, किंवा लोकाची शेती खंडाने करून ती उत्तम