पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


शिक्षक अशा व्यवसायांवर सुशिक्षितांचे पोटहि चांगले भरेल. पोट भरल्यावर ग्रामसभा, पतपेढ्या, ग्रामपंचायत, उत्सव, जत्रा, व्यायामशाळा, अशा निरनिराळ्या क्षेत्रांत लोकोपयुक्त कार्यहि करून दाखवितां येईल. खेडयापाड्यांत राहून स्वतःचा निर्वाह व लोकहित या दृष्टीने काय करितां येईल हें या प्रकरणांत पहावयाचें आहे.
 कृषि - हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. कृषीवरच हा देश जगत आहे. शेतीकडे या देशांत जितकें लक्ष द्यावयास पाहिजे, तितकें दिलें जात नाहीं. ज्यांच्याजवळ विद्या आहे, पैसा आहे, असे कृषिशास्त्रज्ञ शेतकी न करितां नोकऱ्याच करितात ! विचारे शेतकरी तर बोलूनचालून अडाणी; त्यांनाहि शेतांत रावर्णे, कष्ट करणे, मशागत करणें, हें आवडेनासे झाले आहे. सुशिक्षितांप्रमाणे शेतकऱ्यांची हि कारकुनीकडे प्रवृत्ति होत आहे. पाऊस पडला तर शेत पेरावें व राखावें, नाहीं तर मुंबईला कमाईला जावें, हातांत पैसा आला कीं तो उधळावा, अशी शेतकऱ्यांची स्थिति आहे. धान्याच्या पिकांची जास्त काळजी घ्यावी लागते, जास्त राखण ठेवावी लागते, ह्मणून म पैसे पाहिजेत ह्मणून भुईमूग, मिरची, कापूस, अशा पिकांवर इल्लीं भर पडत आहे. एकंदरीत धान्याची पिकें कमी झाल्यामुळे धान्याची निपज कमी होत आहे. याला जर आळा घालावयाचा असेल तर सुशिक्षितांनी खेड्यांत जाऊन स्वतःची शेती स्वतः करण्यास प्रारंभ करावा, नसेल तर दुसऱ्याची शेती खंडाने करावी.
 पुष्कळ सुशिक्षितांची मिराशीची शेती खेड्यांमध्ये असते. पण ती सुधारण्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाहीं. शहरांत जाऊन चहा, तंबाकू, बिझिक, सोंगट्या, पत्ते, नाटकें, यांत कालक्रमणा करणाऱ्यांनी निदान आपल्या घरची शेती दररोज जाऊन येऊन पाहिली व उत्तम देखरेख केली, तरी त्यांना पुष्कळ फायदा होईल. जमिनीचा मालक चैनी व रयत आळशी अशा अवदशेचा प्रकार सर्वत्र आढळतो. हाताखाली चार नोकरचाकर ठेवून त्यांच्यावर उत्तम देखरेख ठेवली तरीसुद्धां शेतकी पुष्कळ फलद्रूप होईल.