पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


भगवद्गीता, दासबोध ( उत्तरार्ध) व गीतारहस्य हे ग्रंथ तरु- णांचे मार्गदर्शक, तरुणांचे मायबाप, व तरुणांचे नाते आहेत. या ग्रंथांचे सूक्ष्म व खोल अध्ययन केल्याशिवाय तरुणांनी राष्ट्रकार्यात पडूं नये. राष्ट्रकार्य करण्याला अनुकूल अशीं अन्तःकरणवृत्ति हे ग्रंथ तयार करितात. निराशेचे, त्राग्याचे, त्रासाचे प्रसंग आले की त्यांतून वर कसें यावें, हैं या ग्रंथांच्या अध्यायनाने चांगले समजते. कार्य करीत रहावें, फलाशा न ठेवितां कार्य करावें, लोकैषणेविरहित कार्य करावें, जगच्चक्र चालविण्याकरितां कार्य करावें, ईश्वरप्राप्त्यर्थं कार्य करावें, ईश्वराची आज्ञा ह्मणून कार्य करावें, आणि शेवटीं " आत्मनस्तु कामाय " कार्य करावें, हें या ग्रंथांचे रहस्य अंतः- करणावर विश्रवून तरुणांनी राष्ट्रकार्यास लागावे.

। उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
_____________
प्रकरण सोळावें.
तरुण पिढी व खेडीपाडी.

 आजकाल जगांत लोकसत्ता निर्माण झाली आहे. लोकसत्तेपुढें राजसत्ता शिर नमवूं लागली आहे. यापुढे हिंदुस्थानांतहि लोक- प्रतिनिधींचेच स्वराज्य व्हावयाचें आहे. हिंदुस्थानचे लोक ह्मणजे हिंदुस्थानाची जनता. ही सर्व जनता खेड्यापाड्यांत आहे. कारण हिंदुस्थान देश हा खेड्यापाड्यांचा देश आहे. स्वराज्याचा वृक्ष जोमदार होण्यास त्याच्या मुळाशी पाणी घातले पाहिजे. स्वराज्य- वृक्षाचीं मुळे खेड्यापाड्यांतील शेतकऱ्याच्या झोपडीत असतात. राष्ट्राचें अन्नहि शेतकऱ्याच्या खोपटींच तयार होतें. राष्ट्रांचे प्राणहि शेतक-याच्या झोंपडीभोंवतीं संचार करीत असतात. अशा शेत- कन्यांना हक्कांचे आणि कर्तव्याचें शिक्षण दिल्याशिवाय स्वराज्य