पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


किंवा शंभर सव्वारों रुपये अशी ठरून गेली आहे, कोण - त्याहि व्यवसायांत आठदहा तास खपून पोटाला पुरेसें मिळण्याची मारामार पडत आहे, अशा स्थितीत देशकार्येच्छु तरुणांनी कुटुंब- निर्वाहा पुरतें घेऊन कोणतेंहि सार्वजनिक कार्य करण्यास हौसेने पुढें आलें पाहिजे. पूर्वीच्या पदवीधर लोकांना सार्वजनिक कार्यात पडतांना खरोखरीच स्वार्थत्याग करावा लागला. स्वार्थत्यागाची व्याख्या त्यावेळी त्यावेळेच्या मानाने बरोबर हि होती. पण आज 'व करूं त्यंव करूं' हाणण्याचे व स्वार्थत्यागाच्या बढाया मारण्याचे दिवस गेले. दरिद्री समाजाच्या पैशावर चाललेल्या सार्व जनिक संस्थांनी बीएला ५०-७५ व एल. एल. बी. ला ऐशी शंभर रुपये मोबदला दिला ह्मणजे तो परिस्थितीच्या मानाने कमी आहे असें नाहीं, पोटापुरतें घेऊन एकाद्या सार्वजनिक संस्थेत काम करणें ह्मणजे मोठासा स्वार्थत्याग आहे असें नाहीं. भावी तरुणांमध्ये सार्वजनिक कार्याच्या दृष्टीने याच कल्पना आल्या तर सार्वजनिक कार्याचे व संस्थांचें जीवन कायम टिकेल. नाहींतर त्याग, भोग, व नाश ही परंपरा खाजगी कार्याप्रमाणें सार्वजनिक कार्यांनाहि भोंवेल. एका पिढीनें त्याग करून संस्थेला किंवा कार्याला कांहीं स्वरूप आणावें, दुसऱ्या पिढीनें त्या कार्यावर जगावें व चैन करावी आणि तिसन्या पिढीत भांडणें होऊन कार्यनाश व्हावा, अशी आपत्ति येईल.
 स्वार्थत्यागाच्या कल्पनाहि यापुढें तरुणांनी बदलल्या पाहिजेत. सरकारी नोकरीत किंवा इतर व्यवसायांत मिळणाऱ्या द्रव्यापेक्षां सार्वजनिक कार्यात पडणाऱ्या माणसांनी पांचपंचवीस रुपये कमी घेतले हाणजे. मोठा स्वार्थत्याग केला ही कल्पनाच चुकीची आहे. पैशावर जो स्वार्थत्याग मोजला जातो त्याच्या मोबदला लौकिक व लोकप्रियता हीं मिळतच असतात. स्वतःला विसरून 'मुक्तसंगोऽ नहंवादी मृत्युत्साहसमन्वितः ' हैं। भगवद्गीतेत सांगितलेलें सात्विक कर्त्याचें लक्षण अंगी बाणून जो कार्य