पान:विद्यार्थि धर्म.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
देशकार्येच्छु तरुणांस काही सूचना.

१३५


घरीं जाऊन पंचपक्वान्नावर हात मारण्याची करण्यासारखेंच हास्यास्पद आहे.
 एवढें खरें की देशांत जवाबदार राजकीय पुढारी थोडे आहेत, त्यांत बोलणे व कृति यांचा मेळ असलेले फारच थोडे, त्यांत तरुणांची अंतःकरणे एकाद्या गोष्टीने भारल्यावर त्याची कड लावणारे पुढारी विरळाच सांपडतील. पण याला कोण काय करणार ? जी वस्तुस्थिति आहे, ती लक्षांत घेऊनच तरुणांनी कार्यास लागले पाहिजे, सत्कर्म करीत रहावें, त्याला कोणीहि साह्य करितो. निदान ईश्वराच्या घरीं तरी तें कार्य रुजू होते; हाच कार्य करणाऱ्यांच्या वृत्तीत समाधानाचा भाग असला पाहिजे.  सर्वस्वी सार्वजनिक कार्यात पडणाऱ्या तरुणांनी पैसा, लौकिक, चैन, विलास, यांच्या क्षुद्र आशा समूळ खणून टाकल्या पाहिजेत. रहावयाला बंगले, फिरावयाला मोटारी व प्रवासाला सेकंडक्लास आणि इतर चैन पाहिजे, असे ज्यांना वाटत असेल त्यांनीं कृपा करून सार्वजनिक कार्यात पडूं नये. पोटाचा कोणताहि धंदा करून खूप पैसा मिळवावा व त्यांतला बराचसा निरनिराळ्या कार्यांना द्यावा. स्वतः दरिद्री राहून राष्ट्राला संपन्न करणें, स्वतः कष्ट सोसून राष्ट्राला सुखी करणें, स्वतःचे महत्व कमी करून राष्ट्राचें महत्त्व वाढविणें या वृत्ति तरुणांमध्ये यावयास पाहिजेत. आधी देश दरिद्री, त्यांत सार्वजनिक कार्ये फार, त्यांत सर्व कार्यांना मदत करणारे ठराविक आश्रयदाते अशा स्थितीत दरिद्री समाजाच्या पैशावर चाललेल्या सार्वजनिक कार्यांचा गौरवच केला पाहिजे, आणि अशा पैशावर कार्ये करणाऱ्यांनी देखील फार जपून खर्च केला पाहिजे, जीवनकलह वाढला आहे, महर्गता मी हाणत आहे, धारण कायमची पांचावर वसली आहे, नोकऱ्यांच्या क्षेत्रांत गर्दी झाली आहे, कितीतरी पदवीधर बेकार झाले आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वकिलांची रेलचेल झाली आहे, वीएची किंमत फार तर पन्नास रुपये व एल् एल् वीची पाऊणशे रुपये