पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


ऐहिक उत्कर्ष आणि निःश्रेयस ह्मणजे पारलौकिक मोक्षं विद्यार्थ्यांना मोक्षाची किंवा ईश्वरप्राप्तीची कल्पना एकदम कळणार नाहीं. तथापि अभ्युदय ह्मणजे आपला, समाजाचा आणि राष्ट्राचा ऐहिक उत्कर्ष व्हावा ही गोष्ट प्रत्येकाला कळण्यासारखी आहे. अर्थात् विद्यार्थ्यांनी अव्यक्तापेक्षां व्यक्त ह्मणजे ढळढळीत दिसणारे ध्येय डोळ्यापुढे ठेवले पाहिजे व तें ध्येय जापल्या आयुष्यांत अखंड ass करून मिळविण्याची इच्छा धरली पाहिजे.

 मानवी आयुष्य " शतायुर्वै पुरुषः या श्रुतिवाक्याप्रमाणें शंभर वर्षे आहे. या शंभर वर्षांपैकी पहिली पंचविशी विद्यार्थि- दशेच्या वाटणीला येते. या पंचविशीतच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून कामास प्रारंभ केला तर भावी आयुष्यांत तें ध्येय हस्तगत करून घेतां येतें. कारण ध्येय हा शब्द आंतर-वाचक आहे. ध्येय आणि ध्याता यामध्ये बरेच अंतर आहे, व तें असले पाहिजे. या दोन वस्तूमध्ये अंतर नसेल तर आयुष्यांत कांहीं प्रसन्नताच राहणार नाहीं. मनुष्याला अकालींच कृतकृत्यता बाहूं लागली तर त्याच्या हातून काय होणार ? किंवा कृतकृत्यतेच्या उलट पूर्ण निराशा किंवा गडद्द अंधःकार डोळ्यांपुढे असल्यास तेंही वाईटच. दुर्दैवानें हिंदु- स्थानांत दुःख, दैन्य, दारिद्र्य, उद्वेग, निराशा, चिंता यांचे पूर्ण साम्राज्य आहे. पारतंत्र्यकांत रुतलेल्या या राष्ट्राला साडेसाती भोंवत आहे; त्यामुळें हिंदुस्थानच्या लोकांच्या आयुष्यांतच एका दृष्टीनें काव्य आणि सौंदर्य राहिलेलें नाहीं, हिंदुस्थानांतील निरक्षर साक्षर, अशिक्षित सुशिक्षित, अज्ञ सुज्ञ, लहान मोठे, कोणतेही घटक घेतले तरी त्यांच्यापुढे कांहीं स्पष्ट ध्येय आहे असे, कचित् आढळेल.. जगणें, जिवंत राहणें, पोट भरणें याची चिंता प्रत्येकाला आहेच, पण या शरीर धारणेच्या अथवा कुटुंब-पोषणाच्या पलीकडच्या कांहीं गोष्टी करण्याची इच्छा असलेली दिसत नाहीं. यदृच्छेने सर्व कार- भार चाललेले आढळतात, आणि ते होतां होतां जें कांहीं थोडें- बहुत आयुष्य देश आणि धर्म यांच्या वाट्याला येईल तें येईल. ठरीब,