पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


असल्यामुळे तरुणांनी ज्या योगाने समाजांत मोठेपणा, व प्रतिष्ठा वाढेल असे सद्गुण मिळविले पाहिजेत. भारदस्तपणा व खोल विचार हे गुण कोणत्याहि कार्याला महत्त्व आणितात .
 हलचे जग वर्तमानपत्रांचें आहे, हिंदुस्थानांतील पुष्कळ वर्तमान- मानपत्रे राजकारणाचीच चर्चा करितात. त्यामुळे राजकारणी पुढा- यांची नेहमी जाहिरात होते. हिंदुस्थानाला राजकारणावांचून गत्यंतर नाहीं. तथापि राजकारणाव्यतिरिक्त देशहिताच्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत. पुष्कळ तरुणांना केवळ लोकैषणेमुळे राजकारणांत पडावेसे वाटतें. राजकारणांत पडण्यासारखा स्वभाव, शिक्षण, व इतर आनुकूल्य नसतांना राजकारणांत पडणें ही चूक आहे. व्यव- हारचातुर्य नाहीं, उलाढाली स्वभाव नाहीं, दीर्घ सूचना नाहीं; अशा माणसाकडून राजकारणाचा व्यवहार कधीहि चांगला होणार नाहीं. राजकारण ह्मणजेच देशकार्य अशी पुष्कळ तरुणांची व जनतेचीहि समजूत झाल्याचें दिसतें. पण ती चुकीची आहे. कारण राजकीय जगाबाहेर पुष्कळ जग आहे, पुष्कळ कार्ये आहेत, पुष्कळ क्षेत्र आहे. त्यांतील आपल्या आवडीचे कार्य घेऊन तें जन्मभर करीत रहाणे, हेंच खरें देशकार्य आहे. देशहिताचें कोणतेही लहानमोठें कार्य जो स्वतःला विसरून कारतो, तोच खरा देशभक्त होय. मग त्याचे नांव दररोजच्या वृत्तपत्री येवो अगर न येवो, तो राजकारणाच्या एका पक्षांत असो वा नसो ! शास्त्रीय ज्ञान, इतिहास, संशोधन, शेतकी, व्यापार, भाषा, धर्म, समाज अशा विविध शाखांत ज्या माणसांनीं शोध करून आपले कर्तृत्व दाखविलें आहे, तीं सर्व माणसें चांगलीं देशभक्त आहेत, त्यांनी मोठेच देशकार्य केलें आहे, असे हाटले पाहिजे, सारांश राजकारण ह्मणजेच देशकार्य ही समजूत सोडून तरुणांनी देशहिताचें जें काम उत्तम करितां येईल तें करण्यास प्रारंभ करावा.
 ज्या तरुणांना राजकारणाच्या आखाड्यांत उतरावयाचे असेल त्यांनीं परतंत्र राष्ट्रांनीं केलेल्या उलाढालींचा नीट अभ्यास करावा;