पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पंधरावें. ]
देशकार्येच्छु तरुणांस कांहीं सूचना.

१३१


आपला पुरुषार्थ ठरवावा. माझी वृत्ति अमुक व माझें क्षेत्र अमुक असे बोट ठेवून सांगतां आले पाहिजे. चार पुरुषार्थापैकीं त्याने मानवी अन्तःकरणांत एकेकच पुरुषार्थ असतो. बाकीच्या वृत्ति असल्या तरी त्या कमीजोराच्या असतात. विद्या, ज्ञान, शोध, यांकडे ज्यांचा कल असेल, त्यांनी त्या क्षेत्रांत जाऊन शांतपणे काम करीत रहावे. नोकरशाहीशी झगडणे, तुरुंगांत जाणें, राजकीय उलाढाली करणें, या क्षात्रकर्माला अनुरूप अशी ज्यांची वृत्ति असेल, त्यांनी राजकारणांत पडावें. पैशाची हांव असेल त्यांनी व्यापार करून खूप पैसा मिळवावा. जेमतेम आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यांत ज्यांना कृतकृत्यता वाटते, त्यांनी कोणची तरी नोकरी पत्करून स्वस्थ रहावें, स्वाभाविक वृत्त्यनुरूप पुरुषार्थ ठरवून कार्यास लागावे; हाणजे शक्तीचा व कालाचा अपव्यय होणार नाहीं.
 तरुणांनीं देशकार्य करण्याची जशी घाई करू नये तशीच दिरं- गाईहि करूं नये. देशकार्याला कच्चेपणा जसा बाधक आहे, तसाच निवरपणा बाधक आहे. खूप पैसा, लोकांत मान्यता, मुलेबाळें, नातवंडे हीं सर्व मिळविल्यावर देशकार्यात पडूं इच्छिणारांना मरे- देशकार्य करण्यास फुरसत मिळत नाहीं, अशीही उदाहरणे आहेत. विद्येचा डौल, संपत्तीचा गर्व आणि श्रीमंतीचा ऐट असलेली माणसे देशकार्याला निरुपयोगींच होत. पण त्या बरोबर हेहि लक्ष्यांत ठेविले पाहिजे कीं विद्या नाहीं, बुद्धि नाहीं, द्रव्य मिळविण्याची पात्रता नाहीं; मनुष्य संग्रहाची अक्कल नाहीं, सारांश जवळ जवळ काहींच नाहीं, अशी माणसें जरी कळकळीचीं असलीं तथापि तीं महत्कार्य करूं शकणार नाहींत.
 कोणतेंहि कार्य करण्याला अधिकार लागतो, “अधिकारपरत्वें " कार्य होते. अधिकार येण्याला तपश्चर्या व्हावी लागते. कार्याला महत्त्व येण्याला व्यक्तिमाहात्म्यहि लागतें. कार्य मोठें ह्मणून तें कर- णारी व्यक्ति मोठी अशी स्थिति आज तरी दिसत नाहीं. व्यक्ति मोठी ह्मणून तिने हाती घेतलेले कामही मोठे अशी आजची स्थिति