पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


नोकरीला वाहिलेले, अशा स्थितींत बुद्धिमान् तरुणांनी हुरळून जाऊन देशकार्याच्या आखाड्यांत एकदम उडी टाकिली तर घाई केल्याचा दोष त्यांच्यावर येईल.
 देशकार्य ही कपिलाषष्ठीसारखी पर्वणी नाहीं कीं. जी साधण्या- करितां घाई केली पाहिजे. देशकार्य हा नित्याचा व्यवहार आहे. विशेषतः राजकारण हाणजे तर मोठा गुंतागुंतीचाच व्यवहार आहे. राजकारणांत पडून स्वातंत्र्ययुद्ध झटझट चालविलें पाहिजे, असें ज्यांना वाटत असेल त्यांनी युद्धप्रसंगीसुद्धां दमादमानेंच युद्ध करावयाचें असते; हे लक्षांत ठेवावें, युद्धांत आघाडीवर लढणारे व मागून पाठपुरावा करणारे जसे सैनिक पाहिजेत, तसेच स्वराज्य मिळविणारे व तें रक्षण करणारेहि लोक पाहिजेतच, हे लक्षांत ठेऊन तरुणांनी विद्यार्थिदशा संपली, स्वभावांत गांभीर्य आलें, परिस्थितीचें आकलनं झालें, स्वतःच्या बुद्धीची व शक्तीची योग्य कल्पना आली, कीं आपल्या स्वभावाला अनुसरून इष्ट तें देशकार्य करण्यास लागावें.
 मानसशास्त्रदृष्ट्या मानवी अन्तःकरणांतील भावनांचे पृथक्करण केल्यास प्रत्येक अन्तःकरणांत एकादचि उत्कट वृत्ति वास करीत असते, असें दिसतें. आमच्या शास्त्रकारांनीं सर्व वृत्तींचें चार पुरुषार्थात समावेशन केले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ, धर्म ह्मणजे नुसतें धारणपोषण, अन्नाच्छादन मिळालें कीं कृतकृत्यता. अर्थ हाणजे द्रव्यार्जनाची व संग्रहाची प्रबळ इच्छा. द्रव्या पुढे ज्ञान, मानव शरीरधारणा यांची किंमत नाहीं. काम ह्मणजे उपभोग, स्वामिभावाची इच्छा. सत्तावान् व्हावें, जगाचा उपभोग घ्यावा, ही महत्त्वाकांक्षा. मोक्ष ह्मणजे ज्ञान. विद्या, ज्ञान, शास्त्र, यांत रंगून जाण्याची वृत्ति. हे अर्थ लक्ष्यांत घेऊन तरुणांनी आपल्या अन्तःकरणांतील स्वाभाविक प्रवृत्तींचे परीक्षण करावे व


  • टीप:- या ठिकाणी धर्म शब्दाचा अर्थ असा संकुचितच आहे.