पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौदावें. ]
स्वदेशसेवेचा ओनामा

१२५


आहे ? पाण्यांत गल्या शिवाय जसे पोहतां येत नाहीं, तसेंच व्यव- हारांत पडल्याशिवाय व राजकारणाकडे पाहिल्याशिवाय कोणतेही सार्वजनिक कार्य करितां येणार नाहीं. प्रत्येक कार्याचा प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष असा राजकारणाशी संबंध येतोच. ह्मणून राजकीय हालचालीकडेहि विद्यार्थ्यांचे लक्ष पाहिजे.

 वास्तविक राजकारणाचे शिक्षण विद्यालयांमध्येच मिळाले पाहिजे. स्वतंत्र देशांत राजकारणाचे शिक्षण प्राथमिक शिक्षणापासून मिळते. स्वदेशसेवेचे पाठ क्रमिक पुस्तकांत दिलेले असतात. पण हिंदुस्थानांत विदेशी सरकारांचें मन विद्यार्थ्याबद्दल कंसाप्रमाणे संशयग्रस्त असल्यामुळें तें विद्यार्थ्यांनी राजकारणापासून सर्वथा अलिप्त रहावें, ह्मणून निरनिराळीं सर्क्युलरें मात्र काढिते आणि शिस्तीची बंधनें घालते. विद्यार्थ्यांनी राजकाणाकडे मुळींच पाहूं नये, असें ह्मणणें सर्वथैव अयोग्य होईल विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत अभ्यासाकडेच लक्ष दिले पाहिजे; हें जरी खरे असलें तथापि विद्यार्थ्यांना ज्या विषयांचा अभ्यास करावयाचा आहे, त्यांत राजकारण हा एक प्रमुख विषय आहे, हें कोणीही विसरूं नये.

 हल्ली पुष्कळ सार्वजनिक कामें उपस्थित झाली आहेत. या सर्व कार्यात पडणारी सर्वच माणसें उच्च भावनेने पडत आहेत, असे कधीही ागता येणार नाहीं. सार्वजनिक कार्याचे शिक्षण नुकतेच मिळू लागले आहे; ही गोष्ट खरी. परंतु कर्तव्यबुद्धीने सार्वजनिक कार्य करण्याची वृत्ति उत्पन्न झाल्याशिवाय ती चांगली होणार नाहीत हेहि खरे आहे. जरा पुढेपुढे करावयाला मिळावें, वर्तमानपत्रांत आपले नांव यावें, चार माणसांच्या ओळखीदेखी व्हाव्या, चार माणसांबरोबर आपला फोटोहि निघावा, लोकांनी मोठे ह्मणावें, चार दिवस यथेच्छ जेवण झोडतां यावें, अशा हेतूंनी पुष्कळशी माणसे सार्वजनिक कार्यात पडलेली दिसतात. एकादे सार्व. जनिक कार्य जरा व्यवस्थित करितां आलें कीं पुष्कळाना "ग" ची बाधा होत असते. या सर्व क्षुद्र वृत्तिचा त्याग करून विद्यार्थ्यांनीं