पान:विद्यार्थि धर्म.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


सार्वजनिक कार्यात ' तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर , या श्रीभगवंताच्या उक्तीप्रमाणें वृत्ति ठेविली पाहिजे. अशा वृत्तीने काम करणाऱ्या जवाबदार माणसास पुष्कळ फायदा होतो. पहिल्याने मनाचा उच्छृंखळपणा व उथळपणा जातो. इष्ट कार्य साधण्याकरितां कोणी कितीही उलट बोलला तरी ऐकून घेण्याची सवय होते. निराश होण्याचे अनेक प्रसंग आले असतां आशेचा किरण कोठें व कसा दिसतो याचें प्रत्यंतर येतें. मानवी स्वभावाचें आकलन होते, समाजांत बोलघेवडे कोण, लबाड कोण, स्वार्थी कोण, धूर्त कोण, दिखाऊ कोण, हें चांगले समजते. सर्वांचें सर्व समजून घेऊन अवगुण न बोलतां कोणाला न दुखवितां सर्व समजून उमजून प्रत्येकाशी कसे वागावें हें कळते. स्वभाव मनमिळाऊ, उत्साही, आणि कार्यतत्पर असा बनतो. कोणतेही सार्वजनिक कार्य ' मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं नच सुखं ' अशी एक वृत्ति बनावी लागते. ती वृत्ति बनल्यावर कोणतेही सार्वजनिक कार्य उत्तम साधतें. यात्रा जत्रा व उत्सव अशा सामुदायिक प्रसंगी स्वयंसेवक होऊन लोकसेवा केल्यास मनुष्यस्वभावाचें चांगलें ज्ञान होतें. पुष्कळ लोकांच्या ओळखीदेखी, पुष्कळ लोकांशी मैत्री आणि सर्वांशीं मनमिळाऊपणा हें कोणत्याहि सार्वजनिक कार्याचे भांडवल आहे. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक कार्य करितांना या भांडवलाला अतिशय जपले पाहिजे.

 प्रत्येकाने मला इतकें कार्य करावयाचें आहे, तें मी पत्करिलें आहे, किंवा वरिष्ठांनी मला सांगितलें आहे, ते मी उत्तम करीन, माझे काम उत्तम झाल्यावर इतरांस मदत करीन, अशी वृत्ति ठेविली पाहिजे. प्रत्येकाने आपापले काम उत्तम केलें, कीं एकंदर कार्य सहजच उत्तम होतें. स्वतःवर सोपविलेले काम न करितां " यानें असे केले त्याने तसे केलें " असें ह्मणत बसण्याची पुष्कळांना सवय असते. त्यामुळे सर्वच कार्याचा बिघाड होतो. स्वतः कांहीं न करितां दुसया नर्वे ठेवण्यांत किंवा दुसन्याची टवाळी करण्यांत कांहीं