पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


जिल्ह्यांत आणि राष्ट्रांत जीं अनेकविध सार्वजनिक कार्ये चाललेली, असतात, त्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष्य प्रथमपासून पाहिजे.

 हल्लीं गांवोगांवी मोफत वाचनालयें निघत आहेत, हीं वाचनालयें झाडणें व उघडणें वर्तमानपत्रे व्यवस्थित ठेवणें, त्यांची नोंद करणें, वर्गणी वसूल करणें, जमाखर्च लिहिणें अर्शी का अभ्यास संभाळून करितां येतात, असा अनुभव आहे. दसरा, पाडवा, भाऊबीज अशा सणांच्या दिवशीं आत्मस्फूर्तीनें पैसाफंड, गोरक्षण, स्त्रीशिक्षण, राष्ट्रियशिक्षण यांच्याकरितां द्रव्य गोळा करण्याचें काम करणें, गांवांत सार्वजनिक उत्सव असल्यास त्यांतील एकादे काम उत्तम तऱ्हेनें करणें, यात्रा, जत्रा, पुण्यतिथ्या, सभा, कीर्तनें, अशा वेळी होईल ती लोकसेवा करणें, हें सर्व करण्यास विद्या- यांनी एका पायावर तयार असले पाहिजे. विद्यार्थ्यांनीं विद्यार्थि- दशेमध्ये सार्वजनिक कार्ये पूर्ण जबाबदारीने करावीत, असे कोणीह ह्मणणार नाहीं. कारण तसें करूं लागल्यास त्यांचा अभ्यास होणार नाहीं. पण अभ्यासाची खोली आणि पुस्तकें या बाहेर न पहाणे. आणि कूपमंडूकवृत्ति अवलंबिणे यासारखें भावी जगांत अनहिताचे कांहीं नाहीं; हैं लक्ष्यांत ठेविले पाहिजे. आजकाल देशांत जागृति उत्पन्न झाली आहे. जागृतीचें चिन्ह हाणूनच कीं काय विविध सार्वजनिक कार्ये आणि सार्वजनिक संस्था निघत आहेत. ज्ञातिहित, आरोग्य, शिक्षण, धर्म, समाज, आणि राजकारण या क्षेत्रांत जीं आंदोलने होत आहेत, त्यांकडे विद्यार्थ्यांनीं दुर्लक्ष करून कसें भागेल १. देशाची तरुण पिढी समाजांतल्या विविध कार्यापासून जर अगदी सोवळी राहिली तर हिंदुस्थान देशाला कधींहि चांगले दिवस यावयाचे नाहींत. विद्यार्थ्यांनीं राजकारणाचा सुद्धां अभ्यास- नीय विषय ह्मणून अभ्यास केला पाहिजे. राजकारण हा एक मोठा व्यवहार आहे, असे समजून विद्यार्थ्यांनी तिकडेहि लक्ष दिले पाहिजे आज विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम संपला कीं उद्यां विद्यार्थी कोणतेही सार्वजनिक कार्य करण्यास समर्थ होतो, असें थोडेंच