पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें ]
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.


याचा अनुभव सर्वास असतोच. अभ्यासेंचि प्रगट व्हावें । नातरी गुप्तचि असावें । या समर्थोक्तीप्रमाणें जगांत येण्यापूर्वी पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. जगांत आल्यानंतर आयुष्य - नौकेवर निरनिराळी वादळें तिला बुडविण्याकरितां येत असतात. ती सर्व नाहींशी करण्याचे सामर्थ्य अंगांत असेल तरच ती नौका वाटेल तिकडे झुकत नाहीं, एवंच या विद्यार्थिदशेमध्ये भावी आयुष्या- करितां लागणारे भांडवल, सद्गुण, शक्ति, संवयी, बुद्धिबल, शरी- रबल, तपोबल, अशा सर्व प्रकारच्या साधनांची जोड करावयाची असते. ही सोन्याची संधि जे गमावितात त्यांना पुढे पश्चात्ताप- पूर्वक 'ते हि नो दिवसागताः' असे रडण्याची पाळी येते. ह। पाळी येऊ नये ह्मणून पंधरा ते पंचवीस वर्षांच्या विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या नकाशांत विद्यार्थिदशा हैं किती महत्वाचे स्थान आहे, हें पुनः पुनः पहावे. आपण कोण आहोत, आपल्याला विद्यार्थिदशेत काय करावयाचें आहे, काय मिळवावयाचे आहे, काय सोडावयाचें आहे, काय जोडावयाचें आहे, याची टोचणी, याची जाणीव निरंतर ठेवावी ह्मणजे त्यांजवर पश्चात्तापाचा प्रसंग येणार नाहीं.

______
प्रकरण दुसरें.
आयुष्याचे ध्येय किंवा साध्य.

 पहिल्या प्रकरणांत विद्यार्थिदशेचे महत्व सांगितलें. आतां या प्रकरणांत विद्याथ्र्यांनी आयुष्याचे ध्येय काय ठेवावें तें कसें ठरवावे याचा विचार करूं.

 सनातन वैदिक धर्माप्रमाणें आयुष्याचं ध्येय अभ्युदय व निःश्रे- यस ह्मणजे प्रपंच व परमार्थ हैं ठरलेलें आहे, अभ्युदय हाणजे