पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चौदावें. ]
स्वदेशसेवेचा ओनामा.

१२३


तिचे कार्य आहे. हें इष्ट कार्य ती करीत आहे, आणि तिच्या कार्यं विघ्न करण्याला या जगांतच काय पण स्वर्गात अगर इतर कोठेंहि कोणीच जन्माला आला नाहीं ! (विवेकानंद खं. ३ मा. २६३.)

___________
प्रकरण चौदावें.
स्वदेशसेवेचा ओनाला.

 स्वदेशाचे महत्व गेल्या प्रकरणांत विद्यार्थ्यांना सांगितले, कांहीं विद्यार्थ्यांपुढे विद्यार्थिदशेतच स्वदेशाकरितां काय करावे, असा प्रश्न उभा रहातो. परंतु समजूं लागल्यापासून अनेक प्रकारांनीं स्वदेश सेवा करितां येते; हे त्यांना माहीत नसतें. विद्यार्थिदशेत स्वदेशसेवेचा ओनामा कसा गिरवावा, हे या प्रकरणांत दाखवावयाचें आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करितांकरितां सार्वजनिक कामांतहि लक्ष्य घातले पाहिजे, प्रौढ, मध्यम, व बाल अशा सर्व विद्यार्थ्यांना सार्व- जनिक कार्यात भाग घेतां येतो. लहानसें एकादें काम जबाबदारीनें करणें, तात्पुरती सांगितलेली कामे करणे, नुसता इकडचा निरोप तिकडे पोंचविर्णे, अशीं सार्वजनिक कामें विद्यार्थ्यांना करितां येतात. विद्यार्थी ज्या घरांत ज्या शिक्षणसंस्थेत असतात, तेथूनच देश- कार्याचा प्रारंभ होतो. रूतःचे घर स्वच्छ, व्यवस्थित व नमुनेदार ठेवणें, शाळेला विद्यार्थिगृह जोडलें असल्यास त्यांतील किंवा आपल्या घरांतील जीं कालें करितां येतील तीं चोख करणें, संस्थेचें सहकारी दुकान व्यवस्थित चालविणे, लेखनोपकरणे स्वदेशी वापरणें, स्वदेशी कपडे घालणें, विद्यार्थ्यांचे स्वयंसेवकदल किंवा बालचरदल उभारणे, खेळांचे सामने देणें, संस्थे- तील चर्चासंस्था चालविणें, हस्तलिखित मासिके काढणे, ह्रीं सर्व देशहिताचीं कार्यों आतांच्या व गुरुजनांच्या नजरेखालीं विद्यार्थ्यांनींच करावयाजोगी आहेत. आपल्या गांवांत, तालुक्यांत,