पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


तों गवताच्या पातीपर्यंत सर्वांचा समावेश एक मानवी अंतःकरण करूं शकते, आणि रूतः अनंतरूप राहते; ही गोष्ट प्रथम येथेच सिद्ध झाली ' सर्व विश्व मीच आहे, त्यांत कोठेंहि खंड नाहीं, त्यांत उडणारी प्रत्येक नाडी माझीच नाडी आहे.' अशा प्रकारचा अभ्यास मनुष्य प्राण्यानें प्रथम याच भूमींत केला

 हिंदुस्थान देश अवनत झाला आहे, अशा मोठमोठ्या आरोळ्या आपणां सर्वांच्या कानांवर आजपर्यंत अनेकवेळां आल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे, अशी माझीही समजूत एकाकाळी होती. पण आज अनुभवाच्या उच्च शिखरावरून केलेल्या अवलोकनानें, अननुकूल पूर्वग्रहांचे डोळ्यांवरील पटल गळून पडल्यानें आणि परकीय देशाच्या भडक रंगांतील चित्रांची वस्तुस्थिति पाहिल्याने माझी पहिली समजूत चुकीची होती, हें मी कनूल करतों. माझा सारा अभिमान बाजूला ठेवून अवनत शिराने मी सांगतों कीं, माझ्या मातृभूमीसंबंधाची माझी समजूत अगदी चुकली होती. हे आर्याच्या पवित्रभूमि, अवनतीनें तुला कधीं स्पर्शहि केला नाहीं ! हजारों राजदंड येथे मांडलें, आणि सामर्थ्य आणि सत्ता हीं चेंडूसारखीं या हातांतून त्या हातांत उडालीं, पण राजदंडाचा स्पर्श येथें लहानशा जनसमूहास मात्र होत होता. त्याचा परिणाम एकंदर जनसमूहावर कधींच झाला नाहीं. त्याच्या चालूं प्रवाहांत कधींच खंड पडला नाहीं. हा प्रवाह कधीं मंद तर चंड; आणि कधीं स्वप्नासारखा अर्धवट स्थितीत, तर कधीं संपूर्ण जागृतावस्थेत होता. अत्यंत दैदीप्यमान् अशी कित्येक शतके माझ्या नजरेस पडतात, त्यावेळी माझी दृष्टि दिपून जाते व हृदय कंपायमान् होतें. या सान्या सांखळीत एखादा दुवा मलिन दिसला तर दुसरा अत्यंत तेजोमय दिसतो. अहाहा ! पहा ! ही माझी माता आपल्या धीरोदात्त गतीने एकेक पाऊल पुढेच टाकीत आहे. तिच्या गतीला अडथळा करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? मनुष्याला त्याच्या पशुवृत्तींतून बाहेर ओढून स्वानंदसाम्राज्याच्या सिंहासनावर बसवावयाचें हेंच