पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तेरावे. ]
स्वदेश.

१२१


ऐहिक सुखें येथें भरून उरला असतां, भर तारुण्याच्या भरांत, यशोदुंदुभि साऱ्या जगभर दुमदुमत असतां आणि जगांतील सर्व सत्ता या राष्ट्राच्या हाती एकवटली असतां, त्या वेळींहि या सर्व पाशांचा उच्छेद करून मायाभ्रमांतून प्रथम बाहेर पडलेलें राष्ट्र हेंच सुख आणि दुःख, सामर्थ्य आणि दौर्बल्य, संपत्ति आणि विपत्ति, हास्य आणि अश्रु, जीवित आणि मृत्यु इत्यादि द्वंद्वांचे परस्पर विरोधी प्रवाह उच्छृंखलपणे वाहात असतां अनंत शांति आणि स्थैर्य यांस प्राप्त करून देणारें कर्म- संन्यासाचें तत्त्व प्रथम याच मानव समुद्रांतून बाहेर पडलें, ज्या भूत जीवित आणि मृत्यु यांचीं अगम्य कोडी सोडविली गेलीं, ती भूमि हीच, जन्मभर सुखाच्यामागें अट्टाहास करून लागावे, आणि हें करीत असतां दुःखांचे पर्वत मात्र डोक्यावर पडावे, हीच मानवी जीविताची चालू स्थिति आहे. असल्या जीवितांत हरघडी प्रत्ययास येणाऱ्या अगम्य कोड्यांस उत्तर याच भूमीतून मिळाले आहे. अशा प्रकारचा प्रयत्न पूर्वी कोठें झालेला नाहीं, आणि याहून सरळ उत्तर दुसन्या कोठून मिळणारहि नाहीं. जन्म होणें हेंच मोठें दुःख आहे, आणि जीवितयात्रा ही सत्य वस्तुची छाया मात्र आहे, हा शोध प्रथम येथूनच लागला. धर्माला प्रत्यक्ष आणि व्यवहार्य रूप आहे, हें प्रथम याच भूमींत निदर्शनास आलें. ज्या प्रमाणे इतर देशांतील स्त्रीपुरुष ऐहिक सुखोपभोगार्थ संसार समुद्रांत निःशंकपणें उड्या घेतात आणि आपणांहून अधिक दुर्बल अशा बांधवांवर मनसोक्त अम्मल चालवितात, त्याच प्रमाणे अनंत सुखाच्या प्राप्तीकरितां कसल्या हि यातनांच्या समुद्रांत स्वतःचा कडेलोट करून घेणारी स्त्रीपुरु प्रथम याच भूमति पैदा झाली. त्याच भूमीत मानवी अंतःकरण विस्तार पावत पावत इतकें मोठे झाले की त्यांत केवळ मनुष्येंच मावलीं असें नाहीं, तर पशुपक्षी, झाडेझुडपे आणि दगड यांचा हि त्यांत अंतर्भाव झाला. अत्यंत उच्च प्रतीच्या देवाधिदेवापासून
१६