पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


तरुणांना सांगावयास पाहिजे काय ? हिंदुस्थानांतील विद्यार्थ्यांना, देशाच्या भावी आधारस्तंभांवा, आपल्या मातृभूमीचं हें पूर्वचं वैभव दिसत नाहीं काय ? पूर्वीचें सर्व प्रकारचे वैभव व हल्लीचे सर्व प्रकारचें दारिद्र्य ही प्रत्यक्ष दिसत असतां भारतभूचे सुपुत्र तिच्या उद्धारार्थ यत्न करणार नाहींत काय ? अर्थात् करतील. तरुणांना या मातृभूमीच्या वैशिष्टयाची आणि संपन्नतेची यथार्थ कल्पना यावी, ह्मणून स्वामी विवेकानंद यांच्या ग्रंथांतील एक गंभीर व मननीय उतारा ( राष्ट्रगीते परिशिष्ट २ पहा ) देऊन हें प्रकरण पुरें करतो.

"धन्य माझी मातृभूमि".

 धन्य ! माझी मातृभूमि धन्य आहे. जो कोणी या पवित्र भूमीवर उभा राहील - मग तो तिचाच पुत्र असो अगर कोणी परकीय असो- त्याला जगांतील अत्यंत पवित्र आणि अत्यंत उच्च हृदयांतून उद्भवणारे विचार तरंग आपल्याभोवती घिरट्या घालीत आहेत, असा प्रत्यय अवश्य येईल. मनुष्यत्व हाणून ज्याच्याजवळ आहे, त्याला हा प्रत्यय अवश्य येईल. त्याचे अंतःकरण अवनत होऊन पशुत्वाची बरोबरी पावले असेल तर मात्र गोष्ट वेगळी. आज हजारों वर्षे हीं पवित्र अंतःकरणें पशुंचे देव बनविण्यांत गुंतलीं आहेत. त्यांनी आपल्या कार्याला आरंभ केव्हां केळा, है इतिहास पुराणें सांगू शकत नाहींत, माझ्या मातृभूमीचें सारें वातावरण आध्यात्मिक विचारांनी दुमदुमून गेलं आहे. नीति आणि अध्यात्म यांची जन्मदात्री हीच भूमि. आपल्या पशुवृत्तीला एक- सारखें चिकटून राहण्याचा यत्न मनुष्य करीत असतां तशाहि स्थितींत मध्यंतरी विसाव्याच्या जागा त्याला येथें सांपडतात. ही वृत्ति सोडून तो ' न जायते म्रियते वा कदाचित् । ' अशा पदवीला जात असतां त्याला योग्य मार्गदर्शकहि येथेच भेटतात, सर्व लौकिक सुखाचं माहेरघर असें म्हणण्याचा एक काळ या भूमींत 'होता. आतां दुःखाचा पेला कांठोकाठ भरून वाहात आहे. तथापि