पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तेरावें. ]
स्वदेश.

११७


आहेत. हिंदुस्थान देशांत पूर्वी अन्न पुष्कळ होतें, ह्मणून लोकांर्चे लक्ष राष्ट्रधर्माकडे लागले नसावें. कसेही असले तरी भावी कालांत राष्ट्रधर्मावांचून हिंदुस्थान देश जगणें शक्य नाहीं, हिंदुस्थान देशां- तील बहुजनसमाजाची निवृत्तिमार्गाकडे प्रवृत्ति होण्यास कोणतीहि कारणे घडली, तथापि जनतेच्या या स्वभावामुळे राष्ट्राचें नुकसान झाले आहे, यांत शंका नाहीं. एक स्वार्थ तरी पहावा नाहीं तर परमार्थाला लागावें, एक देहाचाच स्वार्थदृष्टीने विचार करावा किंवा केवळ देवाकडेच पहात रहावें, ऐहिक गोष्टींचा अत्यंत लालसेने उपभोग तरी घ्यावा, नाहींतर स्वस्थ संन्यास घेऊन " हरिहरि " ह्मणत बसावें, बसे परस्पर विरुद्ध दिशेला जाणारे दोन मार्ग बऱ्याच दिवसांपासून हिंदुस्थानांत चालत आलेले दिसतील. देह आणि देव याच्यामध्ये देश आहे, त्या देशासंबंधीं कांहीं कर्तव्यें आहेत, स्वार्थ आणि परमार्थ यांच्यामध्ये एक परार्थ आहे, त्या परार्थाचा समाजाशी संबंध आहे, जन्मदात्या मातेप्रमाणें अन्नदात्या मातृभूमीची सेवा केली पाहिजे, अशा तऱ्हेच्या कल्पना पाश्चात्य राष्ट्रांत जितक्या ठसठशीत दिसतात, तितक्या आपल्याकडे दिसत नाहींत, यांत संशय नाहीं.

 इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानावर झालें. इंग्रजांच्या राज्यापासून हिंदुस्थानाचें पुष्कळ नुकसान झाले असले, तरी कांहीं फायदेही झालेले आहेत. जित व जेते यांचा जेव्हां संबंध येतो, तेव्हां जेते जितावर बन्याच गोष्टी लादतात; किंवा अनिच्छेने कां होईना जेत्यांच्या पुष्कळ गोष्टी जितांमध्ये येऊ लागतात. इंग्रजांच्या राज्या- बरोबर पाश्चात्य संस्कृति आली, पाश्चात्य संस्कृतीबरोबर कांहीं बया वाईट गोष्टी आल्या. उपलब्ध जगाचे आजतागायत ज्ञान, आधि- भौतिक शास्त्राच्या सामर्थ्याची कल्पना व स्वदेशाभिमान ऊर्फ राष्ट्रधर्म या तीन नवीन गोष्टी इंग्रजांपासून आह्मीं शिकलो, असे कबूल करण्यांत कांहीं कमीपणा नाहीं. राज्यकर्त्यांची शिस्त, देशाभिमान, शास्त्रसंप- न्नता, व्यापार, धडाडी व सर्वोत मूर्धन्य अशी त्यांची मुत्सद्देगिरी