पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ विद्यार्थि - धर्म. [ प्रकरण विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिशा समजण्यास उपयुक्त होईल, शेवटीं आपस्तंत्र धर्मसूत्रांतील ब्रह्मचारिधर्माची सूत्रे सार्थ देऊन 'स्वदेश' या प्रकरणाकडे वळतो. आपस्तंब धर्मसूत्र प्र. १ खं. ३ अनृत्तदर्शी = नृत्य न पहाणारा, नाटके व तमाशे न पहाणारा सभासमाजांश्चागंता= नाईट लोकांच्या अड्यांत व समाजांत न जाणारा, अजनवादशीलः = लोकवार्ता, टवाळी न करणारा, रहः शीलः = एकांतात जाऊन अभ्यास करणारा, स्त्री यावदर्थ संभाषी=स्त्रियांशीं कामापुरते बोलणारा, मृदु:=क्षमाशील, शांत: शांत, दान्तः=आत्मसंयमी, व्हीमान् विनयी दृढधृतिः–दृढधैर्याचा, अग्लांस्नुः उत्साही अक्रोधनः = निग्रही, अनसूयुः - निर्मत्सरी, हे गुण ब्रह्मचान्याचे अंगी असावेत. प्रकरण तेरावें. स्वदेश. हिंदुस्थानांतील लोकांना आजपर्यंत ईश्वरभक्ति, स्वधर्मनिष्ठा आणि जातिसेवा एवढ्याच गोष्टी माहीत होत्या. स्वदेशसेवा, स्वदेशा- भिमान, राष्ट्रियत्व, राष्ट्रधर्म हे शब्द हिंदुस्थानांतील सुशिक्षितांना अलीकडेच परिचयाचे झालेले आहेत, हल्लींच्या युगांत राष्ट्रधर्म, हा युगधर्म आहे. जगांतील मोठमोठीं राष्ट्र हीं या राष्ट्रधर्मवरच जगत