पान:विद्यार्थि धर्म.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बारावें. ]
ब्रह्मचर्य .

११५


सेवन हितावह नाहीं. वीर्यनाश करणारे पदार्थ विद्यार्थ्यांनी सेवन करूं नयेत. विद्यार्थ्यांचा आहार हिल, मित व पथ्यकर असाच पाहिजे. भोजनाचा विचार एका प्रकरणांत केलाच आहे. रात्री सडकून जेवण झालें, तर झोप येत नाहीं व वीर्यनाश होतो. मानसिक श्रम अति झाले तर डोकें तापतें व वीर्यनाश होतो. झोप चांगली न आली कीं, स्वप्ने पडून वीर्यनाश होतो. भोजनास अति उशीर झाला, किंवा वरचेवर उपास आले तर कोठ्यांत उष्णता वाढून वीर्यनाश होतो. सवय नसतां एकदम एकादे काम पांच सहा तास केलें, एकदम पंधरावीस मैलांची पायीं किंवा पन्नास पाऊणशे मैलांची सायकलवरून मजल मारली, तर रात्रीं वीर्यनाश होतो. जागरणावर जागरणे झालीं, सवय नसतां उन्हा- तान्हांत जाण्याचा प्रसंग आला की वयिनाश होतो. अपशब्दोच्चार चावटपणा, फाजील थट्टामस्करी झोपण्यापूर्वी झाली तर वीर्यनाश होतो. विद्यार्थिदशेत शुक्रस्थान दृढ ठेविलें पाहिजे. तें बिघडलें कीं क्षयासारखें रोग जडतात. चहाचे दुष्परिणाम शुक्र- स्थानावर व कोठ्यावरही होतात असें डॉक्टरलोक सांगतात. ह्मणून चहाचे कपावर कप उडवून रात्रींची जागरणे करूं नयेत. खरोखर या नाजूक विषयावर पुष्कळ सांगण्यासारखे आहे. तथापि थोडेच सांगितले पाहिजे, ह्मणून हा विषय आहझी आटोपता घेतो. जाताजातां पालकांना व शाळामास्तरांना एक सूचना करावीशी वाटतें. ती ही कीं, त्यांनीं या विषयावर अगदीं निवडक विद्यार्थ्यांच्यापुढे व्याख्यानं करवावीं. डॉक्तरांचीं व या विषयाचा विशेष अभ्यास केलेल्या तज्ञांची व्याख्याने व्हावीत विद्यार्थ्याशीं संभाषण व चर्चाहि कराव्या, प्रौढ विद्यार्थ्यांना अशा चर्चा हितावह होतील. त्या चर्चांना पालकांनीं हजर रहावें. पालकांनी मुलांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवून त्यांना योग्य दिशा दाखवावी. या विषयावर स्वामी शिवानंद यांचें एक महत्वाचें पुस्तक ' ब्रह्मचर्य रक्षणाचे रामबाण उपाय' हें आहे. ते पालकांना