पान:विद्यार्थि धर्म.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


पडतो. पथ्यामध्यें बेतालपणा असला कीं औषध जसें निरुपयोगी होतें, तसेंच ब्रह्मचर्यव्रताचा अभाव असल्यास विद्येचेंहि वाटोळें होतें.

 कोणतेंहि शास्त्र झटलें कीं, त्यांत विधि व निषेध या दोन्ही गोष्टी असावयाच्याच. शास्त्राची तत्परता विधीवर असते. निषेध हाणजे त्या विधीच्या भोवताली घातलेले एकप्रकारचे कुंपण होय. मनुष्याचे मन विधीकडे लागले, त्यांत तो पूर्ण तन्मय झाला की मग त्याला कशा- चीहि आठवण होत नाहीं. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत बुद्धिवल व शरीरबल मिळविण्याच्या मागे लागलें पाहिजे, तेंच त्यांचे ध्येय आहे. त्या ध्येयांत ते समरस झाले, त्यांना दुसरे तिसरें कांहीं दिसेनासे झालें, झणजे मग वरील गोष्टीकडे त्यांचे लक्ष्य जावयाचेंहि नाहीं, आणि त्यांना अमूक करूं नका असे सांगण्याचा प्रसंगहि येणार नाहीं खरें पाहिलें तर रिकाम्या मनालाच नाना ढंग सुचत असतात. रिकामें मन हा सैतानाचा बाजार आहे. मन एका ठिकाणीं रमलें, मनाला विद्येर्चेच व्यसन लागले की, ते इतर चाहटळ गोष्टीपासून अलिप्त असतें. मन ओढाळ आहे, चंचल आहे, हे सर्व खरे; पण त्याला एका चांगल्या विषयाची गोडी लाविली कीं, तें स्थिर रहातें हेहि खरे आहे. सामान्यतः अभ्यासाचा नाद असलेले, किंवा तन्दुरुस्तीचा नाद असलेले विद्यार्थी वाईट सवयींना बळी पडत नाहींत. इतर मुलांच्या साहचर्याने जरी त्यांना वाईट सवयी लागल्या, तरी त्यांना त्यांचा नाद लागत नाहीं, याचें कारण त्यांच्या मनाला दुसरा विषय खेचणारा असतो. तात्पर्य विद्येचेंच व्यसन विद्यार्थ्यांनी लावून घ्यावें ह्यणजे त्यांना इतर व्यसनें लागणार नाहींत.

 आहारशुद्धि ही एक या व्रतपरिपालनाचें साधन आहे. जसा आहार असेल तसें वीर्य बनते. विशेषतः उत्तेजक आहार असल्यास वीर्याच स्थानापासून च्युति होते, अति गोड, अति तिखट, अति आंबट, असे पदार्थ विद्यार्थ्यांनी वर्ज्य केलें पाहिजेत. कांदा लसूण कांद्याची भजी किंवा यांच्यासारखें तामस पदार्थ यांचे अतिरिक्त