पान:विद्यार्थि धर्म.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


श्री छत्रपति शिवाजी महाराज यांनी भावी करामतीला उपयुक्त असें लोखंडासारखें शरीर लहानपणीच कमावलें होतें. मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ॥ अशी घोषणा करणाऱ्या श्रीसमर्थांनी बाराव्या वर्षीच घराबाहेर पडून चोवीस वर्षांपर्यंत पंचवटीत राहून तपश्चर्या पूर्ण केली होती.


 मनुष्य ह्रटला कीं, सद्गुण व दुर्गुण हे दोन्ही त्याच्या ठिकाणी असतातच. कांहीं केल्या न जाणारे असे दुर्गुण थोडेच असतात. दुर्गुण आणि दुष्ट संवयी नाहींशा करून सद्गुण आणि चांगल्या सवयी शिकणें हेंच खरें विद्यार्थिदशेतील कर्तव्य आहे. कुंभाराच्या चाकावर असलेल्या मातीच्या गोळ्याला पाहिजे तसा आकार जसा देतां येतो आणि कच्च्या मडक्याला ठोकून ठोकून जसें चांगलें बनवितां येते तशीच गत विद्यार्थि- दर्शतील आयुष्याची आहे. पक्कया मडक्यावर कोणताही संस्कार होत नाहीं. तसेंच निवर वयांत कोणतेही नवीन सद्गुण किंवा कोणत्याही नवीन संवयी ग्रहण केल्या जात नाहीत, उलट, सकल अवगुणा माजि अवगुण | आपले अवगुण वाटती गुण । असा अनिष्ट मनःसंकल्प त्या वयांत होऊं लागतो. दुर्गुणांना सद्- गुणांचे पोषक बनविण्याचे सामर्थ्य तारुण्यांतच असतें. सुवासिक आणि असुवासिक अशी दोन प्रकारचीं फुलें माळ्याजवळ अस- तात, तथापि माळ करतांना माळी मधून मधून ती फुलें ओवितो आणि एकंदरीत चांगली मालिका तयार करितो. विद्यार्थिदशेत दुगुर्ण कसे घालवावे निदान त्यांना सद्गुणपोषक कसे बनवावें हें शिकावयाचें असतें.

 प्रवेश परीक्षा पास झाली ह्मणजे शिक्षण घेण्यास लायक समजला जातो. विद्यार्थी कोणतेही उच्च- विद्यार्थिदशा संपल्यावर जगांतील उच्च शिक्षण घेण्यास प्रारंभ झाला असें समजावें. प्रवेश परीक्षेत एकादा विषय कच्चा असला तर पुढे किती नडतें