पान:विद्यार्थि धर्म.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बारावें. ]
ब्रम्हचर्य .

११३


 स्त्रीसंगानें विवाहापूर्वी व्रतनाश होतोच. परंतु स्त्रीसंगाशिवाय इतर वाईट मार्गांनीहि ब्रह्मचर्यव्रताचा नाश होतो. ब्रह्मचाऱ्यांनी स्त्रियांशीं गोष्टी बोलत बसणे, त्यांची थट्टामस्करी करणे, त्यांच्याशी खेळणे, हांसणे, खिदळणे, टकलावून पहाणें, गुप्त भाषणें करणें, मनामध्ये त्यांचे चिंतन करणें, हें सर्व सोडले पाहिजे. अमकी बाई अशी आहे, तमकी तशी आहे अशा चकाट्या पिटीत बसण्याची, प्रौढ स्त्रियांशीं पत्ते खेळण्याची, सरळ रस्त्यानें न जातां वांकडें वांकडे पहात जाण्याची, जत्रा, स्टेशन, आगगाड्या, कीर्तन, पुराण, व्याख्यान अशा गर्दीच्या वेळीं स्त्रियांशीं आंगलट करण्याची अत्यंत हलकट वृत्ति ठिकठिकाणीं दृष्टोत्पत्तीस येते. ती माणुसकीस काळिमा आणणारी आहे म्हणून, विद्यार्थ्यांनी ती टाकिली पाहिजे. विद्यार्थ्यांनी बरोबरीच्या विद्यार्थ्यांशींहि कुस्ती किंवा मस्ती याशिवाय जास्त आंगलट करूं नये. रात्रीं निजतांना दोन समवयस्क विद्यार्थ्यांनी जवळ जवळ निजूं नये. प्राचीन काळचे ब्रह्मचाऱ्यांचे गुरुगृहांतील नियम पाहिले, ह्मणजे गुरुपत्नीशी विद्यार्थ्याने किती मर्यादेनें वागावें हे चांगले समजतें. प्राचीन काळीं गुरुगृहांत असतांना एका गुरु पत्नीशींच काय तो संबंध येत असे. परंतु हल्लींचें जग निराळें जाहल्यामुळे सर्व स्त्रियांशी गुरुपत्नीप्रमाणे विद्यार्थ्यांनी मर्यादेने वागावें, त्यांत त्यांचे कल्याण आहे, यांत शंका नाहीं. इंद्रियग्राम महाबलवान् आहे, तो विद्वानांवरसुद्धां प्रताप गाजवितो, ह्मणून एकांतांत स्त्रियांशी-फार तर काय पण आई, बहीण यांच्याशींसुद्धां फार जपून वागले पाहिजे. स्त्रियांशीं विनोद, थट्टामस्करी, बोलणें, चालणें, हैं सर्व विद्यार्थिदशेत बेतावातानेच पाहिजे. आपस्तंब धर्म- सूत्रांत स्त्रीषुयावदर्थसंभाषी " ह्मणजे स्त्रियांशीं कार्यापुरतेच बोलणारा असे ब्रह्मचान्याचे लक्षण सांगितलें आहे, विद्यार्थ्यांना चित्तस्थैर्य, इंद्रियनिग्रह व विद्या या गोष्टी संपादन करावयाच्या असल्यामुळे त्यांनीं ब्रह्मचर्यव्रताचे पथ्य फार कडक पाळले पाहिजे, कोणत्याहि औषधाचा परिणाम तें सपथ्य सेवन केलें, तरच दृष्टीस
१५