पान:विद्यार्थि धर्म.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


प्रत्येक पालकाला आपणावरून जग ओळखावें " ही ह्मण बरोबर आधारास घेतां येईल, प्रत्यक्ष बापानें आपल्या मुलाला वाईट मुलांच्या संगतीत गेल्यास काय काय सवयी जडतात व त्यामुळे आयुष्याचे कसें मातेरें होतें, हें चांगले समजावून देऊन त्यापासून अलिप्त रहाण्याचा उपदेश केला तर त्याचा इष्ट परिणाम होईल, बापाच्या अभावी जबाबदार पालक, पालकाच्या अभावीं जवाबदार शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना या गोष्टी समजावून सांगाव्यात. हा विषय थोडासा अश्लील आहे खरा; पण या बाबतीत भिडस्तपणा धरण्याचें बिलकुल कारण नाहीं. या भिडस्तपणामुळे तरुण पिढी संगत चालली आहे. " तुका ह्मणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटीं. " हेच तत्व या बाबतीत खरे आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर जी मुख्य गोष्ट पालकांनी विववावयाची ती ही कीं अयोग्य मार्गानें अकाली वीर्योत्सर्ग केल्यास तो आरोग्य व आयुष्यनाशाला कारणीभूत होतो. समजा, एखादा व्यापारी आहे, त्यानें व्यापाराचे मुख्य साधन जे भांडवल ते गमावलें तर त्याचा व्यापार कसा काय नफ्याचा होणार ? भांडवल बरेचसे जमल्यावर मग तें खर्च होऊं लागलें तरी हरकत नाहीं. विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्यदशेमध्यें हे भांडवल चांगलेच जमावयाचें असतें. विद्यार्थिदशेत विद्येचा व वीर्याचाच त्यांना संचय करावयाचा असतो; आणि गृहस्थाश्रमांत त्याचा योग्य व्यय करावयाचा असतो. गृहस्थाश्रमांत आय, व्यय या दोन्ही गोष्टी चालणे योग्य आहे व त्या चालतात. पण विद्यार्थ्याला संचयाचेच काम करावयाचें असतें. पुष्कळ विद्यार्थ्यांना वीर्यनाशाच्या वाईट सवयी लागलेल्या असतात. गृहस्थाश्रमापूर्वी विद्याथ्यांच्या . कानांवर पडूं नयेत त्या गोष्टी पडतात, पण तसे होणे अपरिहार्य आहे. विद्यार्थिदशेमध्ये विद्यार्थ्यांनीं कांहीं कांहीं गोष्टीला फारच जपले पाहिजे. वीर्यनाशाची वाईट सवय असलेल्या माणसाचा संग टाळणे, नाटकें व कांदबऱ्या आणि सिनेमा यांच्यापासून नेहमी . दूर असणें, जीभ आवरून धरणें, या गोष्टी विद्यार्थ्यांनी केल्या पाहिजेत.