पान:विद्यार्थि धर्म.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बारावे. ]
ब्रह्मचर्य.

१११


शृंगाचे रामायणांतील उदाहरण हें तत्कालीन कडक शिस्तीचं द्योतक आहे, असें ह्मणतां येईल. पूर्वीच्या आश्रमांचें आज नवीन प्रकारच्या सुधारणेमध्ये रूपांतर होत जाणार, असे हल्लींच्या विचारसंक्रमणावरून दिसतें. गांवाबाहेर पूर्वीच्या आश्रमाप्रमाणे शाळा असाव्या, शाळेला जोडूनच विद्यार्थिगृह असावें, जनसमाजांतील अनेक प्रकारच्या वातावरणाचे आघात विद्यार्थ्यांच्या मनावर होऊ नयेत, अशा दृष्टीनें हल्ली शाळा व विद्यार्थिगृह यांच्या योजना चाललेल्या आहेत. हळुहळू तत्व जुने पण त्याचें स्वरूप नवें, अशी स्थिति येण्याचा रंग आहे.

 घर ही विद्याथ्यांची खरी शाळा आहे. घर, आश्रम, किंवा नवीन पद्धतीची विद्यार्थ्यांची वसतिगृहे यांमध्ये जितकी शिस्त, जितकी सावधगिरी व जितकें सौजन्य असेल, तितकें विद्यार्थ्यांचे ब्रह्मचर्य चांगले टिकणार आहे. घरांतील आईबाप किंवा पालक केवळ जन्महेतु, शाळेतील शिक्षक टाकभाड्यानें काम करणारे, आणि विद्यार्थिवसतिगृहांत सर्वच अव्यवस्था, अशी स्थिति असली णजे मग विद्यार्थ्यांना गद्धेपंचविशतिले नानाचार करण्यास व शिक- ण्यास चांगलेच फावर्ते. विद्यार्थिवसतिगृहें असावीत, पण तेथे आई- बाप या नात्याने जवाबदारी घेणारी माणसे असतील तरच तीं विद्यार्थिगृहें चांगली. घरंदाज व कुलशील आईबापांवर जी जबाबदारी असते, तिची यथार्थ कल्पना असणारा, व ती जबाबदारी पार पाडणारा जर व्यवस्थापक असेल तरच विद्यार्थिगृह उघडावें, नाहीतर उघडूं नये, घरांत एकादाच मुलगा विघडेल तो फारतर शेजारच्या मुलाला विघडवील. परंतु बेशिस्त असलेल्या विद्यार्थिगृहांतील मुले सर्वांना बिघडवूं शकतात. गृहशिक्षण चांगले असले, विद्यार्थिगृहाची व्यवस्था उत्तम असली, ह्मणजे विद्यार्थ्यांना अयोग्य मार्गानें वीर्यनाश करण्याचा सवयी लागत नाहींत.

 खरे पाहिले तर पालकांनीच विद्यार्थ्यांना ते पंधरा सोळा वर्षांचे झाले हाणजे या सर्व गोष्टी समजावून सांगाव्या. निदान या व्यवहारांत