पान:विद्यार्थि धर्म.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


जितकी सांगावी तितकी थोडीच आहे. ब्रह्मचारी बलभीम मारुति- राय यांचें चरित्र जर रामायणांतून वगळलें तर तें जसें अळणी लागेल. तसेच महाभारत व महाराष्ट्राचा इतिहास हीं दोन्हीं त्यांतून राजा भीष्मांचे कार्य व समर्थांचे कर्तृत्व हीं वगळल्यास निरस लागल्यावांचून रहाणार नाहींत. ब्रह्मचर्यांचा हा येवढा प्रताप आहे. योगशास्त्रांत तर बिंदु गमावणें ह्मणजे मरण व धारण करणें ह्मणजे जीवन, असें ह्यटलें आहे.

 समाजव्यवस्थेप्रमाणें शरीरव्यवस्थेलाहि चातुर्वर्ण्य पाहिजे, डोकें, बाहू, मांड्या व पाय ह्मणजे बुद्धि, पराक्रम, वीर्य, श्रम, हें शारिरां- तील चातुर्वर्ण्य आहे. हिंदुसमाजांतील चातुर्वर्ण्य जसे विस्कळित झाले आहे. तसेंच हिंदुस्थानाच्या लोकांच्या शरिरांतील चातुवर्ण्य दारिद्र्य, अनियमितपणा व मूर्खपणा यामुळें विघडलें आहे. या प्रक- रणांत विद्यार्थ्यांनी वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत ब्रह्मचर्य संपत्ति कशी राखावी, याचा थोडक्यांत विचार करावयाचा आहे.

 सामान्यतः वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून शारिरांत शरिरोपजीवी वीर्य उत्पन्न होऊं लागतें. त्याला पक्कता वयाच्या चोवीस पंचविसाव्या वर्षी येते, असें शररिशास्त्रज्ञ ह्मणतात. शरिरांत वीर्य उत्पन्न झाले व ताबडतोब जर त्याचा व्यय होऊं लागला, तर एकाद्या लहा- नशा रोपड्यासारखी स्थिति होते. एकादें झाडाचें रोपर्डे लाविलें, तें जरा बाळसे धरतें न धरतें तोंच त्याचा एकाद्या व्रात्य मुलाने शेंडा खुडला किंवा कांहीं पानें तोडलीं तर जशी त्याची वाढ खुंटते, तशीच स्थिति विद्यार्थ्यांची होतें.विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेत कडकडीत ब्रह्मचर्य पाळ पाहिजे, असे सक्तीचे नियम स्मृतिग्रंथांत आढळतात. त्यावरून आणि नदीकाठीं, अरण्यांत लोकवस्तीपासून दूर असणारे त्यावेळचे ऋषींचें आश्रम यांचीं ग्रंथांत वर्णने वाचली, तर आपल्या पूर्वजांना ब्रह्मचर्याचे महत्व किती वाटत होते व ते किती जपत होते, याची कल्पना येते. कडक शिस्तीत असल्यामुळे स्त्री ही एक मानव जातीची घटक आहे, ही कल्पनाहि नसलेल्या ऋष्य