पान:विद्यार्थि धर्म.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बारावें. ]
ब्रम्हचर्य.

१०९


पंधरा वीस मैलांचा प्रवास करावा. बराच लांबचा प्रवास असल्यास आगगाडीला पैसे देणें भागच आहे. दहापांच विद्यार्थ्यांनी मिळून पायीं प्रवास करणे अधिक चांगले. अशा प्रवासांत गरीब विद्यार्थ्यां.. चाहि समावेश करतां येतो; व अनेक प्रकारचा अनुभव पायीं प्रवास केल्यानेंच येतो. झातारपणीं यात्रा करण्याची चाल आपल्या समाजामध्यें आहे. परंतु या यात्रा केवळ धार्मिक बुद्धीने केल्यामुळे : त्यांत व्यावहारिक भाग फार थोडा असतो. वास्तवीक विद्यार्थ्यांनी अशा यात्रासुद्धां विद्यार्थिदशेतच केल्या पाहिजेत. प्रवास कसा करावा, कोणकोणच्या दृष्टीने करावा, बरोबर कोणकोणती साधनें असावी, फोटो कोणकोणत्या स्थळांचे व्यावे, प्रवासाच्या माहिती - करितां कोणकोणती पुस्तकें, रेल्वे गाईड्स, नकाशे, हे सर्व आधीं ठरवून प्रवास सामुग्री जय्यत घेऊन मग प्रवासास निघावें. प्रवास कसा करावा, हें पाश्चात्यापासून शिकण्यासारखे आहे. ते लोक आमच्यापेक्षां जास्त शास्त्रीय पद्धतीने प्रवास करीत असतात. विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या बाबतीत त्यांचें अनुकरण करून आपल्या देशांतील प्रवासशास्त्र उत्पन्न केलें पाहिजे, मोठ्या सुटीचा प्रवास करण्याकडे विनियोग झाल्यास विद्यार्थ्यांना सुटी कंटाळवाणी वाटणार नाहीं, एक प्रकारचें नवीन शिक्षण मिळेल; व मिळालेले शिक्षण पचनी पडण्यास फार उपयोग होईल

___________
प्रकरण वारावें.
ब्रह्मचर्य

 विद्यार्थिदशा हाच ब्रह्मचर्याचा काल आहे. हा काल वयाच्या चोवीस वर्षांपर्यंत असतो. ब्रह्म हाणजे वेद. (विद्या) विद्याध्ययना- करितां जें व्रत पाळावयाचें, त्याचे नांव ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्यांची महती