पान:विद्यार्थि धर्म.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


प्रवास — सुटी कशी घालवावी, याचा विचार करतांना सुटीत प्रवास करावा, असे सहजच कोणाच्याहि मनांत येते. प्रवास करण्याला मे महिन्याचे दिवस बरेच सोयीचे असतात. पुस्तकांतलें ज्ञान हैं कोरें करकरीत असतें. तें अंगों मुरण्याला प्रवास करावा लागतो. प्रवास हे ज्ञान अंगीं मुरविण्याचे एक मोठे साधन आहे. ' यस्तु संचरते देशान्यस्तु सेवेत पंडितान् । तस्य विस्तारिता बुद्धि: तैलबिदुरिवभसि ।।' या सुभाषिताप्रमाणें बुद्धचा विकास होण्यास प्रवास हें एक मोठे साधन आहे. श्रीसमर्थांच्या ह्मणण्याप्रमाणें ' प्राणिमात्रांची स्थितिगति ' प्रवासानें कळते. महंताला ' भिक्षामिसें लहानथोरें । परिक्षून सोडण्याकरितां उदंड देशाटण ' करण्याची समर्थांची " आज्ञाच होती. समर्थ हाणतात ब्राह्मणू हिंडता बरा अप्रवासी ब्राह्मण ब्राह्मण्यापासून च्युत होतो, अशा अर्थाचें एक वाक्य महाभारतांत आहे. प्रवासाने बुद्धीचा शिणवटा जातो, नवी तरतरी येते, व जोमानें एकाद्या कार्यास लागावेसें वाटते. तात्पर्य, प्रवासाचे महत्व कांहीं थोडेथोडके नाहीं. विद्यार्थ्यांनी आपल्या भोवतालची धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय स्थळें निर. निराळ्या सुट्यांचा फायदा घेऊन पहावीत. ठिकठिकाचें उत्कृष्ट देखावे, स्थळें, शहरें, पाहिल्याने मनाला एक प्रकारचा आल्हाद होतो. महाराष्ट्रांतील विद्यार्थ्यांना स्फूर्ति देणारे असे अनेक देखावे सह्याद्रि पर्वतांत आहेत. दऱ्या, खोरीं, नद्या, महाराष्ट्रांतले प्रचंड किल्ले, हे विद्यार्थ्यांनीं सवडी सवडीने पाहिले पाहिजेत. दहापांच विद्यार्थ्यांनी मिळून दहापंधरा दिवसांचा प्रवास पायीं करावा. अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये पायी प्रवासाची आवड उत्पन्न झालेली दिसते, हें सुचिन्ह आहे. बालचरांच्या टोळ्या प्रवासाला जातात, स्वतःच स्वयंपाकपाणी करतात, पायीं प्रवास करतात; तसाच प्रबास विद्यार्थ्यांनीं केला पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ मिळून