पान:विद्यार्थि धर्म.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकरावे. ]
सुटी व प्रवास.

१०७


तील लोक ' काय हो हें शिक्षण ? कसला हा विद्यार्थी ! चार इंग्रजी पुस्तकें वाचलीं कीं, सर्व ज्ञान येतें कीं काय ? ' अशा प्रकारे बोलत असत. आजहि विद्यार्थ्यांना सुटीमध्ये घरी आल्यावर आपल्या भावंडांशी आतेष्टाशीं व गांवांतील लोकांशी नीट वागतां येतें, असें नाहीं. तथापि दृष्टिकोन बदलला आहे, एवढे खरे.

 विद्यार्थ्यांनी गांवी आल्यानंतर महिना दीड महिन्यांत थोडेबहुत दाखवितां येईल, असे एखादे काम हातीं घ्यावें तें काम गांवच्या हितसंबंधाचे असावे. तसे नसल्यास निदान आपल्या कौटुंबिक हितसंबंधाचे असावें. एखादें काम हातीं घेतलें व तें करून दाखवावयाचें, असा निश्चय केला ह्मणजे मग विद्यार्थ्यांना जगांत वागावयाचें कसें, हें उत्तम कळते. आपल्या घरी एखादें कार्य उपस्थित झाले तर तें विद्यार्थ्यांनीं व्यवस्थित करून दाखविलें पाहिजे, अशिक्षित माणसापेक्षां सुशिक्षित माणसानें कोणतेंहि काम चांगले करून दाखविले पाहिजे. त्यांतच त्याचा सुशिक्षितपणा आहे. मे महिन्याची सुटी ह्मणजे लग्नकार्याचे दिवस. विद्यार्थ्यांनीं अंग मोडून काम करून या सर्व कार्यांना कांहीतरी निराळें वळण घालून दिले पाहिजे. कार्य, प्रस्थ, लग्न मुंज, उत्सव, जत्रा यांपैकीं जें जें त्या सुटीमध्यें सांपडेल, त्यांत भाग घेऊन तें उत्तम करून दाखविण्याची महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. सर्वच विद्यार्थ्यांना हीं कामें साधतील असें नाहीं, परंतु तीं साधतात किंवा नाहीं, हें पहाण्याचें व न साधल्यास तीं चांगलीं करून दाखविण्याचें वयहि र्हेच असतें; ह्मणून प्रयत्न करण्यास कांहीँ अडचण नाहीं. निदान विद्यार्थ्यांनी सुटीमध्ये अनियमितपणें वागून प्रकृति तरी बिघडूं देऊं नये. विद्यार्थी सुटीत घरी गेल्यावर त्यांच्या बेताल आहारविहारानें पोट दुखणे, डोके दुखणे, ताप येणे, असल्या आजारांना बळी पडतात. तेव्हां दुसरें कांहीं नाहीं झालें, तरी प्रकृति चांगली ठेवून नियमित तास दोन तास : अभ्यास व थोडें बहुत सार्वजनिक कार्य त्यांनी केले, तरी पुष्कळ होणार आहे.