पान:विद्यार्थि धर्म.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


असल्यास तें उरकून येर्णे, हीं कामें करावीत. पुष्कळ विद्यार्थ्यांना सुटीच्या पूर्वी आपण अमुकअमुक करूं, असें वाटतें, आज करूं उद्यां करूं असें ह्मणतां ह्मणतां सुटी निघून जाते; व शेवटीं सुटी व्यर्थ गेल्याबद्दल मनाला वाईट वाटतें. बहुतेक शिक्षकांना असा अनुभव आहे की, विद्यार्थ्यांचा दररोज नेमून दिलेला अभ्यास जसा चांगला होतो, तसा सुटीत होत नाहीं. हा अनुभव कांहीं विद्यार्थ्यांच्या बाबतीत येत नसेल; कारण त्यांना आपले हिताहित कळत असतें, परीक्षेची टोचणी असते, ह्मणूनच अभ्यास होतो. परंतु असले विद्यार्थी सोडून दिले ह्मणजे बाकीच्या विद्यार्थ्यांची सुटी 'न देवाय न धर्माय ' अशीच जाते. सर्वात मोठी सुटी ह्मणजे मे महिन्याची सुटी होय. या सुटीत बहुतेक विद्यार्थी घरी येतात, आईबापांना मुले घरी आली कीं, अर्थात् आनंद होतोच. पण मुलांचा अनिय- मितपणा, अव्यवस्थितपणा नजरेस येऊ लागला कीं, आईवाप ' मुलें बाहेर असली ह्मणजे ठीक असतात. तीं घरीं आलीं क त्यांना कसलाच कांच नसतो' असे उद्गार काढतात. केव्हांतरी उठणें, वेळीं अवेळीं घरांत स्वातंत्र्यानें पाहिजे तें खाणें अनियमितपणें व्यायाम करणें, जाग्रणें करणें, निदान सोंगट्या, पत्ते, गंजिफा झोडर्णे, यांमध्यें काल घालविण्यांत बऱ्याच विद्यार्थ्यांची सुटी जाते. कांहीं विद्यार्थी शहरांतून आपल्या गांवी आले की, घरांतील लोका- शीहि अक्कडबाजपणे वागूं लागतात. आपल्या गांवांतले लोक जंगली, अडाणी, मूर्ख, अशी त्यांची समजूत असते. यांचे शहाणपण काय तें केस विंचरण्यांत, भांग काढण्यांत, नेकटाय घालण्यांत आणि असलेच ढंग करण्यांत लोकांना दिसून येत असतें ! अलीकडे विद्यार्थ्यांची वृत्ति पुष्कळ निवळलेली आहे. पंधरा वीस वर्षापूर्वी लोकांना मूर्ख समजणारा विद्यार्थी गांवीं गेला कीं, तो लोकांच्या कर- मणुकीचा अथवा चर्चेचाच विषय होऊन बसत असे! कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये दहा वर्षांपूर्वी आपल्या गांवांतील लोकांत मिळून मिसळून वागण्याची मनोवृत्ति बिलकुल दिसत नसे. त्यामुळे गांवा-