पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकरावे.]
सुटी व प्रवास.

१०३


 हल्लींचा व्यवहार परिस्थितीमुळे मोठा विकट व जिकीरीचा झाला आहे. पैसे खर्चूनसुद्धां मनासारखें कोणतेंच काम होत नाहीं, असा अनुभव येत आहे. विद्यार्थ्यांनी ही सर्व परिस्थिति लक्ष्यांत घेऊन प्रपंचांतील सर्व आपत्तींना तोंड देण्याकरितां कंबर कसली पाहिजे. गृहस्थाश्रमांत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अनेकविध व्यवहार चौकसपणे माहित करून घेतले पाहिजेत; तरच त्यांचा या जीवन कलहांत टिकाव लागेल.

__________
प्रकरण अकरावें.
सुटी व प्रवास.

या प्रकरणांत विद्यार्थ्यांनी आठवडयाची एक दिवसाची सुटी, पांच सहा दिवसांची मिळालेली सुटी, दिवाळीची महिना पंधरादिव- सांची सुटी आणि उन्हाळ्याची सुटी कशी घालवावी, याचे विवेचन येणार आहे.

 सर्व विद्यालयांना बाजारच्या दिवसासह आठवड्यांतून दीड दिवस सुटी असते. रविवारी सर्वत्र सुटी असते. रविवारचा सुटीचा दिवस ह्मणजे अव्यवस्थितपणा, गावाळपणा यांचेच जणूं काय प्रदर्शन दाखविण्याचा दिवस; अशी वस्तुस्थिती आजच्या व्यवहा- रांत आहे. ' यवदाचरति श्रेष्ठः ' या प्रमाणे वडील माणसांचे अनुकरण विद्यार्थी करीत असतात. शहरांतील शिकलेला पांढरपेशा वर्ग व कारकुनी धंदा करणारा वर्ग गांवांत कसलीही सटरफटर भिकार नाटक कंपनी असली, तरी शनिवारी रात्रीं नाटक पहावयाला बहुतेक जात असतो. वडीलांच्या मागोमाग विद्यार्थ्यांनाही जावेसे वाटते. ज्या गांवांत अशी नाटक कंपनी नसते, तेथे शनिवारच्या रात्रीं कोणत्याहि निमित्ताने निजावयाला अपरात्र होते. शनिवारी रात्री