पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


जागरण न करणारे कॉलेज मधले विद्यार्थी फारच थोडे भेटतील. एकंदरीत रविवारच्या अव्यवस्थितपणाला शनिवार रात्रीपासून सुरुवात होते. मग पालक असोत; वा विद्यार्थी असोत. सर्वांनीं सकाळीं आठ नऊ वाजतां निजून उठावयाचें; नंतर मुखमार्जन, चहा, इकडे- तिकडे, बाजार व भोजन. भोजनोत्तर पुनः झोप. त्यानंतर विद्यार्थी असल्यास थोडा अभ्यास, पत्ते झोडणें, सायंकाळी फिरावयास जाणें, गप्पा मारणें, असा त्या दिवसाचा कार्यक्रम असतो.

 विद्यार्थ्यांना रविवारचे स्वातंत्र्य सुटी या स्वरूपांत मिळाले पाहिजे, याबद्दल वाद नाहीं. मनुष्य हाणजे कांहीं यंत्र नाहीं, अगदीं चरकांत ठेवल्यासारखें त्यांला वागविणें इष्ट नाहीं, हें सर्व खरें. परंतु रविवारचा दिवस ह्मणजे आयुष्यनाशाचा व अव्यवस्थितपणाचा दिवस, असें जें आज त्याचें स्वरूप आहे; ते बदलले तरच तो खऱ्या विश्रांतीचा दिवस असे ह्मणतां येईल. विद्यार्थ्यांनी रविवारी अभ्या- सच करावा, असें ह्मणर्णे अयोग्य होईल. सहा दिवसांपेक्षां सुटीचा कार्यक्रम कांहीं निराळा पाहिजे. विद्यार्थी घरी असले तर रविवार सकाळचा दिवस त्यांनी घरच्या कामांत घालवावा. घरांत बाग असल्यास जरा मार्गे पुढे पाहून तींत नेटकेपणा आणणे, घरी जनावरें असल्यास त्यांच्याकडे लक्ष्य देणें, घरची स्थिति मध्यम असल्यास घरांतलीं कोळिष्टकें झाडणें, घरांतली मोरी उपसून स्वच्छ करणें, आसपास उकिरडा असेल तर तो उचलून टाकणें, घरांतला एखादा भाग गलिच्छ झाला असल्यास मजुराची वाट न पाहतां सारविर्णे, घरचा बाजारहाट करणें, आपली स्वतःची खोली खालून वरून स्वच्छ झाडणें, ढेकूण काढणे, स्वतःचे कपडे धुणे, घरांत आईबापांना कोणी साह्य करणारे नसल्यास त्यांना साह्य करणें, अशीं कामें सुटीच्या दिवशीं विद्यार्थ्यांनी करावीत, दर आठवड्यास हींच कार्मे केली पाहिजेत, असेही नाहीं. एखाद्या सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळी दहा पांच विद्यार्थ्यांसह शिधोरी बांधून घेऊन शेजारी एखादा डोंगर, एखादे रम्य स्थळ किंवा