पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
विद्यार्थि - धर्म

[ प्रकरण


करणें आहे. दुसन्याला जवळ करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. कोणाला कांहीं शिकवून, कोणाच्या उपयोगी पडून, तर कोणांशी गोड बोलून माणसें जवळ करावयाची असतात. “जो बहुतांचे सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना " || असे श्री समर्थ सांगतात पुष्कळाचें पुष्कळ सोसल्या शिवाय पुष्कळ स्नेही कसे होतील? कोणार्थी न जमणें, कोणीहि मित्र नसणें, कोणाचेहि उपयोगी न पडणें, हीं सर्व करंटेपणाची लक्षणे होत. ' समस्तासि भांडेल तोची करंटा ' ' उदंड ओळखी होतां उदंड भाग्य होतसे । उदंड कळहो होता उदंड लथ खातसे ॥ ' हा श्री समर्थांचा व्यवहारांतील सिद्धांत महत्वाचा आहे. ह्मणून शेजारधर्म, परोपकार, या गोष्टी लहान- पणापासून शिकल्या पाहिजेत.

 हल्लीं स्वावलंबनाची महती फार गायली जाते, खरें स्वावलंबन जर पहावयाचे असेल तर तें जुन्या, आचार संपन्न, दुकानें वाग- णाऱ्या, वृद्ध गृहस्थामध्ये चांगले दृष्टीस पडते. प्रपंच व्यवसाय व गृहकृत्य यांत जुनीं माणसें इतकीं दक्ष असतात कीं तशी दक्षता क्वचितच आढळेल. जुन्या वळणाच्या माणसांना आळस हाणून नसतो. कामामध्ये उच्चकाम, नीचकाम, हा विचार त्यांच्या मनांत येत नाहीं. कांहीं काळ स्नानसंध्या, कांहीं काळ व्यवहार, कांहीं काळ वाचन, असा सर्व वेळ बांधून टाकिलेला असतो. नव्वद ब्याण्णव वयाचे वृद्ध गृहस्थ इतके स्वावलंबी आह्मी पाहिले आहेत, कीं त्यांना नमस्कारच करावासा वाटतो. स्वतःचे कोणतेंहि काम ही माणसे दुसऱ्यास करू देत नाहींत. आपल्यासाठी दुसऱ्यांना किंचितहि त्रास होऊ नये, अशी यांची उत्कट इच्छा असते, एक दोन दिवसांपेक्षां स्नानसंध्या न अंतरतां आणि एकदोन दिवसांपेक्षां जास्त आजारी न पडतां ' अनायासेन मरणम् ' या प्रमाणें ज्यांचें प्राणोत्क्रमण झालेलें आहे, तेच खरोखरी स्वाव- लंबी होत.