पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहावें. ]
शिष्टाचार व व्यवहार.

१०१


कोणी आजारी असतांना त्याच्याकडे न फिरकणारे व त्याच्यासाठीं इकडची काडी तिकडे न करणारे पुष्कळ विद्यार्थी असतात. त्यांना आजायाच्या शुश्रूषेचे महत्व माहीत नसतें, असें झटले पाहिजे. मिशनरी लोकांनी दवाखान्यांच्या द्वारे लोकांवर उपकार करून त्यांना ऋणी करून आपल्या धर्मांत व समाजांत घेतलें आहे, हाणून घर, शाळा, वसतिगृह, गांव, आणि आप्तेष्ट अशा निर- निराळ्या नात्यांनी आजान्यांस मदत करण्याची संधि येत असते, ती विद्यार्थ्यांनी केव्हांहि फुकट घालवू नये.

 विद्यार्थ्यांनी शेजार धर्माचाहि थोडासा व्यवहार संभाळला पाहिजे. आडले जाकसले जाणावें । यथानुशक्ति कामास यावें || या समर्थोक्तीप्रमाणें आपल्या शेजाऱ्यास जी मदत करितां येईल, ती करावी. शेजारधर्म हें गृहस्थाश्रमांतलें मोठें कर्तव्य आहे, तथापि विद्यार्थ्यांनाहि शेजाऱ्याला निरनिराळ्या प्रसंगी मदत करितां येते. शेजारच्या घरी कोणी आजारी पडलें तर औषध पाणी आणून देणे, त्याचा बाजारहाट करणे, हीं कामें विद्यार्थ्यांनी करावींत. शेजारच्या घरीं कांहीं कार्य, प्रस्थ असले तर त्याच्या घरीं जाऊन पाणी भरणे, केर काढणें, वाढणें अशीं सर्व तऱ्हेचीं कामें करावीत. आसपास कोणी मृत झाले तर त्याच्या स्मशानयात्रेस विद्यार्थ्यांनी धावून गेलें पाहिजे. कोठें आग लागली, कोठें मारामारी झाली, कोठे आणखी कांहीं झाल्याचे समजलें तर विद्यार्थ्यांनीं गांगरून न जातां न भीतां तो प्रसंग नीट समजून घेऊन त्यांत योग्यतऱ्हेने वागले पाहिजे.

 विद्यार्थ्याचा परोपकारी स्वभाव घरांतच दिसला पाहिजे. घरच्या मंडळींच्या उपयोगी पडणें, शेजाऱ्यास मदत करणें, या गोष्टीची ज्याला सवय असते, तोच मनुष्य कोणत्याहि प्रसंग. कोणालाहि मदत करूं शकतो. दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याची, व दुसन्या करितां थोडी बहुत झीज सोसण्याची लहानपण सवय पाहिजे. उपकार करर्णे ह्मणजे एका दृष्टीने दुसऱ्याला जवळ