पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
विद्यार्थि - धर्म.

[ प्रकरण


या वरून वडिलांशीं बहुमानानें व अदबीने वागावें, बरोबरीच्या मंडळींचें प्रेम संपादन करून त्यांना मित्र बनवावें, आणि लहान भावंडांशीं अनुकंपेनें वागावे, असे ठरतें. समजुतदार विद्यार्थी लहान भावंडांशी चांगल्या तऱ्हेने वागत असले ह्मणजे तीहि आईबापांना एक प्रकारची मोठीच मदत होते. भावंडांत मिळून मिसळून वागल्याने विद्यार्थ्यांची प्रेमळ वृत्ति जागृत रहाते. त्यांचा तुसडा आणि माणूसघाणा स्वभाव बनत नाहीं. तान्ह्या मुलांना खेळविणें, लहान भावंडाशी गप्पागोष्टी करणें, आणि बरोबरीच्यांशी आढ्यता न ठेवतां मोकळ्या मनाने वागणे, हा विद्यार्थिधर्म आहे. भावंडांप्रमाणें र्जी आप्त माणर्से, आत्या, चुलती, काका, मामा, अजोबा, भावजय, बहीण इत्यादि असतील, त्यांच्याशीं विद्यार्थ्यानें सौजन्यानें व प्रेमळपणाने वागावें.

 रुग्णशुश्रूषा हैं एक व्यवहारांतील मोठें अंग आहे. घरांत कोणी आजारी पडलें, तर त्याची शुश्रूषा घरांतील सर्व मंडळींनी केली पाहिजे. बाजारांतील औषधे आणणें, सायकलीवर बसून चटकन् वैद्य किंवा डॉक्तर यांना बोलावून आणणे, रोग्याची सर्व स्थिती समजावून घेऊन औषध घेऊन येणे, रोग्याचे कपडे धुणे, हांतरुण घालून देणें, दररोज सकाळी व सायंकाळीं रोग्याची खोली झाडून काढून तेथे धूप घालणें, त्याचे हात व पा चेपणे, आजाऱ्याची मलमूत्राची भांडीं स्वच्छ धुणे, आजाऱ्याला धीर देणे, त्याची कुपथ्याकडे प्रवृत्ति होत असेल, तर तिला आळा घालणें, आजायला चैन पडत नसल्यास त्याचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणें, वृद्ध मनुष्य आजारी असल्यास गीता, विष्णुसहस्त्र - नाम वाचणें, लहान असल्यास त्याला गोष्टी सांगणे, इतक्या गोष्टी आजाऱ्याच्या शुश्रूषेमध्ये येतात. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी करण्या- बद्दल उत्सुक असले पाहिजे. मनुष्य आजारामध्यें असाहाय्य असतो त्याला दुसन्याच्या मदतीची जरूरी असते; अशा वेळीं घरच्या किंवा बाहेरच्या आजायास मदत करण्याची संधि गमावूं नये. घरांत