पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहावे. ]
शिष्टाचार व व्यवहार.

९९


तो मनुष्य व्यवहार कसा करतो, कसा बोलतो, कसा चालतो, या सर्व गोष्टी पहावयाला मिळतात. हिंदुस्थानांत अशी पद्धत फारशी नाहीं. एकाच्या अनुभवाचा फायदा दुसऱ्याने घ्यावयाचा, अशीच परंपरा वास्तवीक असावयास पाहिजे. प्रत्येकाचा अनुभव निराळा, कोणाचा कोणास उपयोग नाहीं; अशी स्थिति देशाच्या उत्कर्षाच्या दृष्टीनें हानिकारक आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण, व्यापार, सार्वजनिक कार्ये, अशा विविध व्यवहारांत ज्या तरुणांना पडावयाचें असेल, त्यांनीं त्या व्यवहारांत जे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध व वयोवृद्ध असतील, त्यांची सेवा करून ह्मणजे त्यांचे जवळ कांहीं दिवस राहून आपणांस इष्ट तें ज्ञान मिळविले पाहिजे.

 आईबाप, शिष्ट, वृद्ध, या शिवाय विद्यार्थ्यांनीं भावंडांशी कसें बागावें, हें ही शिकले पाहिजे. घरांमध्ये लहान मोठीं भावंडे असतात, त्याच्याशी प्रेम, सहकार्य, सहानुभूती, आणि अनुकंपा अशा निरनि राळ्या वृत्तींनी विद्यार्थ्यांना वागतां येत नाहीं. घरांत पांच सहा मुलें असली की एकमेकांस गालिप्रदान, क्षुद्र खाण्यापिण्याच्या कारणां- वरून मारहाण आणि नेहमी भाऊबंदकी, असा व्यवहार पुष्कळ घरांत घडतो. अशा घरांतल्या आईबापांना मुलें ह्मणजे एक साडे- सातीचाच फेरा, असे वाटतें. प्रौढ विद्यार्थ्यांनीं भावंडांमध्ये वाग- तांना त्यांच्या सर्व मनोवृत्ति पाहून वागलें पाहिजे. बारिक सारिक गोष्टींत आपलाच हेका चालविणें, लहान भावंडाशी तुसडे- पणाने वागणें, ज्यांत त्यांत स्वतःचे शहाणपण दाखविणें, अशा सवयी विद्यार्थ्यांना असतात. त्या त्यांनी सोडल्या तरच भावंडांचें त्यांचे पटेल, वृद्ध, बाळ, तरुण व इतर या सर्वांशी कसे वागावें, हैं भागवतांत (स्कंध ३ अ. २९ श्लो. ७ मध्ये ) भक्तीचा विचार करीत असतांना फार चांगले सांगितले आहे.

महतां बहुमानेन दीनानामनुकंपया |
मैाचैवात्मतुल्येषु यमेन नियमेनच ॥