पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


विद्यार्थ्यांना शिकण्यासारख्या आहेत. त्या सर्वांचा या ठिकाणी नामनिर्देश करणे शक्य नाहीं. विद्यार्थ्यांना विद्याभ्यास करावयाचा असतो, त्यांतीलच शिष्टाचार हा एक अभ्यसनीय विषय आहे, एवढे त्यांनी लक्ष्यांत ठेवावें ह्मणजे झाले.

 वृद्धसेवा हा एक व्यावहारिक शिक्षणाचा मोठा भाग आहे. वृद्धांच्या किंवा वडिलांच्या संगतीत कांहीं काल घालविल्याने त्यांच्या अनुभवाचा, पोक्तपणाचा, उच्छृंखल व अपक्कवृत्तीवर चांगलाच परिणाम होतो. अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे व्यवहार करून त्यांतून वर आलेले वृद्ध आप्त जो अनुभव सांगतात, त्याचा फायदा घेण्याकरितां विद्यार्थ्यांनी वृद्धसेवा अवश्य केली पाहिजे. पूर्वी गुरुगृहांत राहून गुरू- सेवा करावी लागे. तेथें वृद्धसेवा ही केव्हां घडे, आतां तो प्रश्न राहिला नाहीं. ज्यांच्या नशिबाने घरांत वृद्ध आत आहेत, त्यांनी तरी वृद्धसेवेचा प्रसंग दवडूं नये. " घरांतली झातारडी आजी काय सांगते, तिला काय कळते " असे झणून तिची हेटाळणी करण्यांत हंशील नाहीं. घरांतील झातारी आजी सुद्धां दोन गोष्टी बी. ए. झालेल्या विद्यार्थ्यां- च्या कल्याणाच्या दृष्टीनें सांगूं शकते. महाभारतांत अर्जुनालाही श्रीकृष्णांनी एकदां "हा मूर्खा, वृद्धांची सेवा केलेली नाहींस, न वृद्धाः सेविता स्त्वया" असा टोमणा मारिला आहे. 'गांडीव धनुष्य दुसऱ्यास देऊन टाक' असें हाणणाऱ्याचा शिरच्छेद करीन, अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. धर्मांनें तसें हाटल्यामुळे अर्जुन त्याचा शिरच्छेद करण्यास सरसावला. त्यावेळीं श्रीकृष्णांनी अर्जुनाला कार्याकार्यविवेक सांगितला आणि असल्या आचरट प्रतिज्ञाकरण्यांत किती मूर्खपणा आहे, हें त्याला पटवून दिलें; असा कथाभाग कर्णपर्वात आहे. निष्कर्ष इतकाच कीं वृद्धसेवा हें एक शिक्षणाचे महत्त्वाचे अंग आहे. पाश्चात्य देशांत मोठमोठ्या लोकांच्या जवळ उमदेवार ह्मणून होतकरू तरुणांनीं कांहीं दिवस रहाण्याची चाल आहे. जगांत अनेक व्यवहार आहेत. अनेक व्यवहारांत अनेक तऱ्हेचीं जीं निपुण माणसें असतात; त्यांचे अंतेवासित्व पतकरल्यास